
हिवाळ्यात लोक थोड सुस्त बनतात, तसेच त्यांना थकवाही जाणवतो. या ऋतूमध्ये रोगप्रतिकारक शक्ती देखील कमकुवत होते. यामुळे अनेकांना सर्दी होते, तसेत तापही येतो. अनेक लोकांच्या जवणात सकस आहाराची कमतरता आहे, त्यामुळे ते आजारांना बळी पडतात. तुमच्यापैकी अनेकजण मोमोज आणि चाउमीन खात असाल, मात्र हे पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत असं योगगुरू रामदेव बाबांनी म्हटले आहे. त्यामुळे असे पदार्थ हिवाळ्यात खाणे टाळले पाहिजेत. त्याऐवजी तुम्ही तुमच्या आहारात खालील पदार्थाचा समावेश करू शकता.
अनेक आरोग्य तज्ञ हिवाळ्यात आहारात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या, शरीर मजबूत आणि तुम्हाला उबदार ठेवणाऱ्या पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला देतात. अशातच आता रामदेव बाबा यांनी एक हिवाळ्यासाठी देसी नाश्ता तयार केला आहे. जो आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हा नाश्ता घरी अगदी सहजपणे बनवता येतो आणि तुम्हाला निरोगी ठेवतो. याची माहिती जाणून घेऊयात.
रामदेव बाबा अनेकदा त्यांच्या इंस्टाग्रामवर फिटनेसशी संबंधित व्हिडिओ शेअर करत असतात. यावेळी त्यांनी हिवाळ्यासाठी एक देसी हिवाळी नाश्ता शेअर केला आहे. यामुले शरीर उबदार राहील, पचन सुधारेल आणि वजन कमी करण्यास देखील मदत होईल. या व्हिडिओमध्ये रामदेव बाबा यांनी म्हटले की, सध्याच्या काळात लोक मोमोज आणि चाउमीन खूप खातात, ज्याचा शरीराला कोणताही फायदा होत नाही. त्यामुळे तुम्हाला देशी नाश्त्याची आवश्यकता आहे. यामुळे तुमचे आरोग्य सुधारेल.
रामदेव बाबा यांनी सांगितले की, फास्ट फूड खाणे टाळते पाहिजे. त्याऐवजी हिवाळ्यात चुरमा बनवून खाल्ला पाहिजे. यासाठी ते बाजरीच्या भाकरीचा चुरा करायता, त्यात तूप आणि साखर घालायची आणि हाताने चांगले मिसळायचे आणि खायचे. संपूर्ण हिवाळ्यात हा नाश्ता करू शकता.
फेलिक्स हॉस्पिटलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. डी.के. गुप्ता यांनी सांगितले की, बाजरीची भाकरी खाल्याने शरीराला दुहेरी फायदे होतात. हिवाळ्यात बाजरी शरीराला आतून उबदार ठेवते आणि ताकद वाढविण्यास मदत करते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. हे ग्लूटेन-फ्री धान्य आहे. यात कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे (बी कॉम्प्लेक्स) आणि खनिजे (लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम, जस्त आणि कॅल्शियम) आहेत. त्यामुळे बाजरी आरोग्यासाठी फायदेशीर आहे.