तज्ञांकडून जाणून घ्या , हिवाळ्यातील सुपरफूड असलेला आवळा चाऊन खाणे चांगले आहे की त्याचा रस पिणे अधिक फायदेशीर
आवळा हिवाळ्यातील व्हिटॅमिन सी ने समृद्ध असलेले फळ आहे. जर हे हंगामी फळ तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारात समाविष्ट केले तर ते शरीराला असंख्य फायदे देऊ शकते. तथापि आवळा हा चाऊन खाणे अधिक फायदेशीर ठरेल की त्याचा रस बनवून सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल हे आपण आजच्या लेखात तज्ञांकडून जाणून घेऊयात.

हिवाळ्यातील हंगामी फळांचा विचार केला तर आवळा हा व्हिटॅमिन सीचा सर्वोत्तम स्रोत मानला जातो. हिवाळ्यात तुमच्या आहारात आवळा समाविष्ट केल्याने आरोग्य चांगले राखण्यास मदत होते, कारण ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. आवळा चटणी, लोणचे, जाम आणि कँडी अशा विविध पदार्थ बनवण्यासाठी आवळ्याचा वापर केला जातो. अशातच आवळा चाऊन खाणे चांगले आहे की त्याचा रस पिणे अधिक फायदेशीर आहे हे आपण आजच्या लेखात तज्ञांकडून जाणून घेऊयात.
आवळा हा प्राचीन काळापासून औषध म्हणून वापरला जात आहे, कारण आयुर्वेदात ते पॉवरफूल औषधी गुणधर्म असलेले फळ मानले जाते, म्हणूनच आयुर्वेदिक संयोजन त्रिफळा मध्ये समाविष्ट केले आहे. चला त्याचे फायदे, पोषक तत्वे आणि ते खाण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया.
आवळ्यामध्ये किती पोषक तत्वे असतात?
वेब एमडीच्या मते , आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए, लोह आणि कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते. त्यात प्रथिने आणि फायबर देखील असतात. शिवाय आवळा हा अनेक पॉवरफूल अँटिऑक्सिडंट्स आणि वनस्पती-आधारित संयुगांचा स्रोत आहे.
आवळा खाणे कसे फायदेशीर आहे?
निसर्गोपचार आणि आयुर्वेद तज्ञ यांनी सांगितले आहे की आवळा कच्चा चावणे त्याचा रस पिण्यापेक्षा जास्त फायदेशीर आहे. आवळा चावल्याने लाळेत मिसळते, ज्यामुळे पचन सुधारते. त्यामुळे दात, हिरड्या आणि जबड्यांचा व्यायाम देखील होतो. आवळा चावल्याने चेहऱ्याचे स्नायू देखील सक्रिय होतात.
आवळ्याचे फायदे काय आहेत?
त्वचा तरुण राहील
हेल्थलाइनच्या मते, आवळा खाल्ल्याने तुमची त्वचा तरुण राहू शकते, कारण व्हिटॅमिन सी हे एक अँटिऑक्सिडेंट आहे जे पेशींना नुकसान होण्यापासून वाचवते आणि कोलेजन उत्पादनात देखील मदत करते, म्हणूनच ते तुमची त्वचा नैसर्गिकरित्या तरुण ठेवण्यास मदत करते.
केस निरोगी होतील
केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी आवळा प्राचीन काळापासून वापरला जात आहे. तो केसांना लावणे आणि खाणे हे दोन्ही तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे केसांची वाढ होण्यासही मदत होऊ शकते. आवळा केवळ फायदेशीर नाही तर एक स्वादिष्ट फळ देखील आहे.
डोळ्यांसाठी फायदेशीर
आवळा खाणे डोळ्यांसाठी देखील फायदेशीर आहे कारण त्यात व्हिटॅमिन ए असते. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मते , आवळा डोळ्यांच्या पेशींचे मायटोकॉन्ड्रियल आरोग्य सुधारून वयाशी संबंधित समस्यांपासून संरक्षण करतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
