AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकाच आवळ्यात केवढे गुण… रोज एक आवळा खा आणि….

आवळा हा व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत आहे, जो शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतो. रोज एक आवळा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण आवळा सुपरफूड आहे का? लेखात या प्रश्नाचे उत्तर आणि आवळ्यातील पोषण तत्वांची माहिती देण्यात आली आहे. आवळ्याचे सेवन कसे करावे आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याचीही मार्गदर्शन करण्यात आले आहे.

एकाच आवळ्यात केवढे गुण... रोज एक आवळा खा आणि....
| Edited By: | Updated on: Jan 02, 2025 | 4:17 PM
Share

आरोग्यासाठी आवळा खाणं अत्यंत महत्त्वाचा असल्याचं सांगितलं जातं. दर महिन्याला मिळणारं हे फळ नाही. त्यामुळे आवळा वर्षभर टिकवून ठेवता येत नाही. आवळ्याच्या हंगामातच तो मिळतो. त्यामुळे पोषक तत्त्व हवे असतील तर हंगामातच आवळा खाणं कधीही चांगलं. त्यामुळे शरीर चांगलं राहतं आणि शरीराला पोषक तत्त्वही मिळतात.

आवळ्यात अशी काय पोषणतत्त्व आहेत?

आवळ्यात व्हिटॅमिन सी आहे. आवळ्यात व्हिटॅमिन सी भरपूर असतो. शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी महत्त्वाचा आहे. पण तिखट चवीमुळे काही लोक हे चांगलं फळ खाणं टाळतात. परंतु व्हिटॅमिन सी मिळवण्यासाठी तुम्हाला खूप जास्त आवळा खाण्याची आवश्यकता नाही. रोज एक आवळा देखील पुरेसा आहे. तुमच्या तंदुरुस्तीसाठी आवळा खाणं चांगलं आहे. फक्त एक आवळ्याचे इतके गुण! म्हणजे आवळा सुपरफूड आहे का? याच प्रश्नाचे उत्तर शोधत आम्ही शोधत होतो. त्याचीच माहिती तुम्हाला देणार आहेत.

आवळ्यात काय आहे?

एका आवळ्यात साधारणपणे 465 ते 466 मिलिग्रॅम अ‍ॅसकोर्बिक ऍसिड (व्हिटॅमिन सी) असतं. त्याचबरोबर काही प्रमाणात तंतूही असतात. अ‍ॅसकोर्बिक ऍसिड म्हणजेच व्हिटॅमिन सी. एकाच आवळ्यात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. हे व्हिटॅमिन सी मिळवण्यासाठी तुम्हाला चार संत्रे किंवा दोन मोठ्या पिअर खायला लागतील. परंतु खरंतर एका ज्येष्ठ व्यक्तीला रोज किती व्हिटॅमिन सी आवश्यक आहे? पोषणविज्ञानानुसार, एका प्रौढ व्यक्तीला दररोज फक्त 45 ते 50 मिलिग्रॅम व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. मुलांना 25 ते 35 मिलिग्रॅम व्हिटॅमिन सी आवश्यक असते. तथापि, त्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन सी घेतल्यास काहीच त्रास होणार नाही.

व्हिटॅमिन सी का आवश्यक आहे?

शरीराची रोगप्रतिकारक क्षमता योग्य राखण्यासाठी रोज पुरेसे प्रोटीन आणि व्हिटॅमिन सी सेवन आवश्यक आहे. जखम भरून येण्यासाठीही शरीराला व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. व्हिटॅमिन सी घेतल्याने तुमची केस गळती थांबते, त्वचाही चांगली राहते.

आवळा सुपरफूड आहे का?

सुपरफूड्समध्ये काही गुणधर्म असले पाहिजे. एक खाद्य पदार्थ शरीराच्या संरचनासाठी, शरीराचं होणारं नुकसान थांबवण्यासाठी, रोगप्रतिकारासाठी, शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी किंवा कार्यशक्ती प्रदान करण्यासाठी फायदेशीर ठरले तर त्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुपरफूड म्हणता येईल. आवळा केवळ रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याच्या बाबतीत उत्कृष्ट असला तरी त्यात इतर गुणधर्म नाहीत. म्हणून खरंतर आवळा सुपरफूड नाही.

आवळा सुपरफूड निःसंशयपणे एक उत्कृष्ट फळ आहे. त्याची तिखट चव असली तरी रोज किमान एक आवळा खा. किंमतीतही परवडणाऱ्या ह्या फळाचा स्वाद घ्या. काही आवळे फ्रिजमध्ये ठेवू शकता. यामुळे त्याचे पोषण गुण टिकून राहतात. काही लोक आवळ्याचा लोणचं बनवून ठेवतात. मात्र, असे केल्याने त्याचे पोषण गुण नष्ट होतात कारण उष्णतेमुळे व्हिटॅमिन सी नष्ट होतो.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा