Ramdev Baba: बद्धकोष्ठता आणि गॅसचा त्रास होतोय? रामदेव बाबांनी सांगितली खास योगासने

बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना बद्धकोष्ठता आणि गॅसचा त्रास होतो. दोन्ही समस्या पोटाशी संबधित असल्यामुळे अनेकांना त्रासाचा सामना करावा लागतो. यावर रामदेव बाबांनी खास उपाय सांगितला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Ramdev Baba: बद्धकोष्ठता आणि गॅसचा त्रास होतोय? रामदेव बाबांनी सांगितली खास योगासने
baba ramdev yoga
| Updated on: Oct 17, 2025 | 9:08 PM

बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना बद्धकोष्ठता आणि गॅसचा त्रास होतो. दोन्ही समस्या पोटाशी संबधित असल्यामुळे अनेकांना त्रासाचा सामना करावा लागतो. चुकीचा आहार, कमी पाणी पिणे आणि व्यायामाकडे दुर्लक्ष करणे या गोष्टींमुळे वरील समस्या उद्धवते. त्याचबरोबर जास्त वेळ जेवण करणे किंवा जेवण टाळणे, तणाव, कमी झोप घेणे या कारणांमुळेही बद्धकोष्ठता आणि गॅसचा त्रास होऊ शकतो. खासकरून जे लोक दिवसभर ऑफिसमध्ये काम करणार कर्मचारी किंवा वृद्धांमध्ये जास्त आढळते. ऑफिसमधील कर्मचाऱ्यांमध्ये आणि वृद्धांमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात आढळते. यावर रामदेव बाबांनी खास उपाय सांगितला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

योगासने ठरतील फायदेशीर

बद्धकोष्ठता आणि गॅसचा त्रास कमी करण्यासाठी रामदेव बाबांनी काही योगासने सांगितली आहेत. नियमित योग केल्यास पचनसंस्था मजबूत होते आणि आतड्यांची हालचाल सुधारते ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि गॅस कमी होतो. तसेच योगामुळे रक्त प्रवाह सुधारतो, तसेच पोटाचे स्नायू ताणले जातात ज्यामुळे पचन सुधारण्यास मदत होते. तसेच योगामुळे मानसिक ताण देखील कमी होतो. रामदेव बाबांच्या मते योगामुळे दैनंदिन जीवनात संतुलन आणि शिस्त येते, यामुळे पोट निरोगी राहते. बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या कमी करण्यासाठी खालील योगासने फायदेशीर ठरतात

पवनमुक्तासन

पवनमुक्तासन केल्याने पोटात साचलेला वायू बाहेर निघण्यास मदत होते. तसेच या आसनामुळे पोटातील सूज कमी होते आणि आतड्यांची हालचाल सुरळीत होते. हे आसन नियमित केल्याने पचन सुधारते, ज्यामुळे गॅसची समस्या कमी होते.

उत्तयनपादासन

उत्तयनपादासन या आसनामुळे पोटाच्या स्नायूंवर ताण येतो, ज्यामुळे आतड्यांची हालचाल वाढते. यामुळे पोटात साचलेला वायू बाहेर पडतो आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

नौकासन

नौकासन केल्याने पोटाचे स्नायूं बळकट होतात, तसेच यामुळे पचन सुधारते. हे आसन केल्यामुळे गॅस आणि बद्धकोष्ठता कमी होते.

सेतुबंधासन

सेतुबंधासनामुळे पोट आणि छातीच्या भागावर हलका दाब येतो, ज्यामुळे पचन सुधारते. हे आसन केल्यामुळे गॅस, पित्ता आणि पोटदुखीपासून आराम मिळतो.

मालासन

मालासन या आसनामुळे आतड्यांच्या हालचाल सुरळीत होते. हे आसन बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. या आसनासह कोमट पाणी पिल्यास चांगला फायदा होतो.

रोज सकाळी रिकाम्या पोटी किंवा जेवण केल्यानंतर काही तासांनी वरील आसने केल्यास बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या कमी होऊ शकते.

खालील गोष्टी लक्षात ठेवा

  • रिकाम्या पोटी किंवा हलक्या जेवणानंतर योगासने करा.
  • एकाच आसनाचा जास्त वेळ सराव करू नका
  • दिवसभर भरपूर पाणी आणि फायबरयुक्त पदार्थ खा
  • जास्त वेळ एकाच जागेवर बसू नका; दर तासाला थोडे चालणे फायदेशीर ठरेल
  • जास्त त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.