काही मिनिटांत दूर करा तणाव, वाटेल फ्रेश आणि रिलॅक्स!

आम्ही तुम्हाला यासाठी एक अतिशय प्रभावी मार्ग सांगणार आहोत, जेणेकरून तुम्हाला अवघ्या दोन मिनिटांत तणावापासून मुक्ती मिळेल. मात्र हे रोज करावं लागतं हे, चला जाणून घेऊया...

काही मिनिटांत दूर करा तणाव, वाटेल फ्रेश आणि रिलॅक्स!
feel relax
Image Credit source: Social Media
| Updated on: May 03, 2023 | 5:23 PM

मुंबई: आजची जीवनशैली तणावपूर्ण आहे. बहुतेक लोक झपाट्याने याला बळी पडत आहेत. अशा तऱ्हेने ऑफिस किंवा घरच्या गोष्टींमुळे रोज तणावात किंवा चिंतेत असणाऱ्यांपैकी तुम्हीही एक आहात का?  जर होय तर आम्ही तुम्हाला यासाठी एक अतिशय प्रभावी मार्ग सांगणार आहोत, जेणेकरून तुम्हाला अवघ्या दोन मिनिटांत तणावापासून मुक्ती मिळेल. मात्र हे रोज करावं लागतं हे, चला जाणून घेऊया…

  1. एका कपमध्ये मिल्क पावडर, थोडं मीठ, गुलाबाच्या पाकळ्या, गुलाबतेल, दोन चमचे बदामतेल मिक्स करा. आंघोळ करताना टब किंवा बादलीत ठेवा. तणाव दूर करण्यासाठीही हे प्रभावी आहे.
  2. तणाव दूर करण्यासाठी वाफ हा एक सोपा आणि प्रभावी मार्ग असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. साध्या पाण्यात अरोमा ऑईल किंवा कोणतेही सुगंधी तेल मिक्स वाफ घेतल्याने तुम्हाला ताजेतवाने वाटेल.
  3. तणाव कमी करण्यासाठी आणि लगेच ताजेतवाने होण्यासाठी 3 मिनिटे चालणे खूप चांगलं ठरेल असा डॉक्टरांचा विश्वास आहे. आपण उद्यानात किंवा बागेत हिरव्या गवतावर फिरू शकता. यामुळे तुमचा ताण कमी होईल आणि तुम्हाला फ्रेश वाटेल.
  4. ताणतणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी व्यायामही महत्त्वाचा आहे. त्यासाठी तुम्ही सरळ उभे राहा. आता वाकून तळवे मांडीवर ठेवा. हनुवटी जमिनीला समांतर म्हणजे समोर चेहरा ठेवा. दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. या अवस्थेत काही काळ राहिल्यानंतर नॉर्मल अवस्थेत या. तुम्हाला हलकं वाटेल.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)