Sedentary lifestyle | बैठ्या जिवनशैलीमुळे पायात वेदना? व्हेरिकोज व्हेन्सचे दुखणं गंभीर, समजून घ्या कारणे आणि उपचार!

| Updated on: Jul 24, 2022 | 5:45 PM

Sedentary lifestyle | सलग एकाच ठिकाणी बसून काम करत राहिल्याने पाय दुखू लागतात. अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून झालेल्या गाठींमुळे पोटरी व पायात वेदना होवू शकतात. हे सर्व ‘व्हेरिको व्हेन्स’ मुळे उद्भवणाऱ्या समस्या असू शकतात. या नसांचा रंग हिरवा, निळा किंवा जांभळा असू शकतो. जर एखाद्याला पायात निळ्या नसा दिसल्या तर त्याकडे दुर्लक्ष करू नये कारण काही प्रकरणांमध्ये या निळ्या शिरा गंभीर आरोग्य समस्येचे लक्षण असू शकतात.

Sedentary lifestyle | बैठ्या जिवनशैलीमुळे पायात वेदना? व्हेरिकोज व्हेन्सचे दुखणं गंभीर, समजून घ्या कारणे आणि उपचार!
पायाची समस्या
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

Sedentary lifestyle | अनेक लोक नोकरी, व्यवसाय किंवा इतर कारणांमुळे सतत बसून राहतात. त्यामुळे त्यांना अनेक शारीरिक व्याधींचा (physical ailments) सामना करावा लागतो. त्यात प्रमुख म्हणजे पाय दुखीचा आजार. लोक या पायदुखीकडे दुर्लक्ष करतात, पण असे केल्याने धोका आणखी वाढू शकतो. द मिररच्या मते, सतत बसल्यामुळे पाय दुखत असतील किंवा सूज येत असेल तर ते व्हेरिकोज व्हेन्समुळे (Varicose veins) असू शकते. पायांमध्ये दिसणाऱ्या निळ्या-जांभळ्या किंवा लाल नसांना व्हेरिकोज व्हेन्स म्हणतात. सर्व प्रौढांपैकी सुमारे 25 टक्के लोकांमध्ये व्हेरिकोज व्हेन्स असतात. बहुतेक प्रकरणांमध्ये, अशुद्ध रक्तवाहिन्या (Impure blood vessels) फुगून झालेल्या गाठीच्या नसांचा पुंजका खालच्या पायांवर(पोटरीवर) दिसतात. आरोग्य तज्ञ चेतावणी देतात की, जास्त बसल्याने व्हेरिकोज व्हेन्स होण्याचा धोका वाढतो. पुरुष आणि स्त्रियांमध्ये ही स्थिती अगदी सामान्य आहे. जर कोणाला ही समस्या असेल तर त्याने त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

अशुद्ध रक्तवाहिन्यामुळे गाठी

अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून झालेल्या गाठीच्या नसा प्रामुख्याने हात, पाय, टाच, घोटा आणि बोटांमध्ये दिसतात. या सुजलेल्या आणि मुरलेल्या शिरा आहेत. ज्या निळ्या किंवा गडद जांभळ्या रंगाच्या असतात. दिसायला त्या फुगलेल्या आहेत. या नसांभोवती स्पायडर व्हेन्स असतात. या शिरा लाल आणि जांभळ्या रंगाच्या असून त्या दिसायला अतिशय पातळ आणि बारीक असतात. जेव्हा स्पायडर व्हेन्स व्हेरिकोज व्हेन्सला घेरतात तेव्हा त्यांना वेदना आणि खाज सुटते. अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून झालेल्या गाठीचा नसा बहुतेक लोकांसाठी धोकादायक नसतात, परंतु काही प्रकरणांमध्ये त्या गंभीर समस्या निर्माण करू शकतात.

हे सुद्धा वाचा

अशुद्ध रक्तवाहिन्यांचे कारण?

द मिररच्या वृत्तानुसार, एखादी व्यक्ती सलग जास्त वेळ बसून राहिल्यास त्याच्या पायात रक्त साचू शकते. आरोग्य तज्ञांनी चेतावणी दिली आहे की, जास्त बसल्याने तुमच्या व्हेरिकोज व्हेन्सचा आजार वाढू शकतो. यामुळे सतत नसांवर अतिरिक्त दबाव पडतो. परिणामी सूज आणि फुगवटा वाढू शकतो, त्यामुळे जास्त वेळ बसणे टाळा.

व्हेरिको व्हेन्सची अन्य कारणे
गर्भधारणा
रजोनिवृत्ती
वय 50 पेक्षा जास्त
बराच वेळ उभे राहणे
लठ्ठपणा
जुनी जखम
कौटुंबिक इतिहास

व्हेरिकोज व्हेन्सची लक्षणे

पायांमध्ये तीव्र वेदना आणि सूज
– पायांना सतत दुखणे आणि सूज येणे
-संध्याकाळी पाय जड पडणे
– रात्री पायात गोळे येणे
– संध्याकाळी पाय दुखणे
– व्हेरिकोज व्हेन्स लालसर होणे
-व्हेरिकोज व्हेन्स (अशुद्ध रक्तवाहिन्या) फुगून झालेल्या गाठींचा गरम स्पर्श
– व्हेरिकोज व्हेन्स फुगून झालेल्या गाठींना इजा होवुन रक्तस्त्राव
-व्हेरिकोज व्हेन्स फुगून झालेल्या गाठी जवळील त्वचा कोरडी पडणे
– व्हेरिकोज व्हेन्स फुगून झालेल्या गाठींमध्ये सूज

व्हेरिकोत व्हेन्स च्या गुंतागुंत

व्हेरिकोज व्हेन्स(अशुद्ध रक्तवाहिन्या) फुगून झालेल्या गाठी सर्वांसाठीच धोकादायक नाही. मात्र,काहींना ते गंभीर समस्या निर्माण करू शकतात. वेळीच उपचार न केल्यास, काही लोकांमध्ये अल्सर आणि रक्तस्त्राव देखील होऊ शकतो. ज्या लोकांना व्हेरिकोज व्हेन्सची समस्या असते, त्यांच्या रक्तात गुठळ्या होण्याची शक्यता खूप जास्त असते. जे शरीरासाठी खूप धोकादायक असू शकते आणि तुम्हाला माहित आहे की रक्तामध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात आणि काही प्रकरणांमध्ये रक्तदाब वाढल्यान मृत्यू होऊ शकतो.