वर्क फ्रॉम होमचे साईड इफेक्ट्स: एकाच जागी बसल्याने मानसिक आरोग्य बिघडण्याचा धोका; वाचा संशोधन काय सांगतं?

| Updated on: Aug 04, 2021 | 9:49 AM

कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर अनेक कार्यालयांनी वर्क फ्रॉम होम सुरू केलंय. मात्र आता या वर्क फ्रॉम होमचे साईड इफेक्ट्स समोर येऊ लागले आहेत. (Sitting for too long can have adverse effects on mental health)

वर्क फ्रॉम होमचे साईड इफेक्ट्स: एकाच जागी बसल्याने मानसिक आरोग्य बिघडण्याचा धोका; वाचा संशोधन काय सांगतं?
work from home
Follow us on

नवी दिल्ली: कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर अनेक कार्यालयांनी वर्क फ्रॉम होम सुरू केलंय. मात्र आता या वर्क फ्रॉम होमचे साईड इफेक्ट्स समोर येऊ लागले आहेत. दीर्घकाळ एकाच जागी बसून काम केल्याने वजन तर वाढतंच त्याशिवाय मानसिक आरोग्याच्या समस्याही उद्भवण्याची शक्यता इंग्लंडच्या संशोधकांनी व्यक्त केली आहे. (Sitting for too long can have adverse effects on mental health)

कोरोना काळात लोकांच्या जीवनशैलीत बदल झाला आहे. त्याचा परिणाम समजून घेण्यासाठी अभ्यास करण्यात आला. मार्च 2020मध्ये लावण्यात आलेल्या पहिल्या लॉकडाऊनच्या काळात हा अभ्यास करण्यात आला आहे.

व्यायाम करणे आवश्यक

इंग्लंडच्या हडर्सफिल्ड विद्यापीठातील संशोधकांनी हे संशोधन केलं आहे. लॉकडाऊनमध्ये लोक एकाच जागी बसून 8 तास काम करत आहेत. एवढा दीर्घ काळ एकाच जागी बसून काम केल्याने त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. तसेच आठवडाभर 150 मिनिट व्यायाम करणाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम झाल्याचं या संशोधनात आढळून आलं आहे. दीर्घकाळ काम करायचं असेल तर जास्त व्यायाम करण्याची अधिक गरज आहे.

300 लोकांचा अभ्यास

या संशोधनात डॉ. लियान जेवेडो यांनीही भाग घेतला होता. आम्ही बसून काम करणाऱ्या 300 लोकांचा अभ्यास केला. यातील 50 टक्के लोक 8 तास एका जागी बसून काम करायचे. एका व्यक्तिला कमीत कमी अर्धा तास तरी व्यायाम केला पाहिजे. तसेच एक तासाची वर्कआऊट ही आदर्श मानली जाते, असं लियान यांनी सांगितलं.

बसण्याची वेळ कमी करा

मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून वर्क फ्रॉम होण करणाऱ्यांनी बसण्याचा टाईम कमी केला पाहिजे. एकाच जागी बसण्याची सवय बदला. केवळ जिममध्ये जाणं पुरेसं नाही. तर मेंटल हेल्थ सुधारण्यासाठी गार्डनिंगसारखी अॅक्टिव्हिटीज केली पाहिजे. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं. (Sitting for too long can have adverse effects on mental health)

 

संबंधित बातम्या:

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये 10 हजारांनी घट, अ‍ॅक्टिव्ह केसेसमध्येही घसरण

उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या कोविड रुग्णांना ब्रेन स्ट्रोकचा धोका अधिक; इंग्लंडच्या संशोधकांचा दावा

पावसाळ्यात लेप्टोस्पायरोसिसचा सर्वाधिक धोका, लक्षणे तापासारखीच; साचलेल्या पाण्यात जाऊ नका

(Sitting for too long can have adverse effects on mental health)