Health | चहाच्या घोटासोबत सिगरेटच्या झुरक्याची सवय? कर्करोगाला मिळेल निमंत्रण, वाचा काय सांगतो रिसर्च…

| Updated on: Feb 14, 2021 | 4:37 PM

असे बरेच लोक आहेत ज्यांना चहाच्या घोटाबरोबर सिगारेटचे झुरके घेणे आवडते. ही आरोग्याच्या दृष्टीने सर्वात वाईट सवय आहे.

Health | चहाच्या घोटासोबत सिगरेटच्या झुरक्याची सवय? कर्करोगाला मिळेल निमंत्रण, वाचा काय सांगतो रिसर्च...
चहा आणि सिगारेट
Follow us on

मुंबई : प्रत्येक व्यक्तीला चहा पिण्यास आवडते. यापैकी एखाद्याला बेड टी आवडत असेल, तर एखाद्याला दिवसातून बर्‍याच वेळा चहा पिण्यास आवडते. जगाच्या आणि देशाच्या प्रत्येक कोनात आणि कोपऱ्यावर आपल्याला चहाचे दुकान सापडेल आणि तेथे बरेच लोक चहा पिताना देखील दिसतील. असे बरेच लोक आहेत जे दिवसात 10-10 कप चहा पितात, परंतु अशा प्रकारे चहा प्यायल्याने आपल्या शरीरावर काय परिणाम होतो, याचा त्यांना अंदाजच नसतो (Tea And Cigarette combination can cause cancer).

जास्त प्रमाणात चहा पिणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. ही एक सवय आहे जी आपला जीव देखील घेऊ शकते. म्हणूनच ही सवय वेळेत सुधारणे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक ठरते. असे बरेच लोक आहेत ज्यांना चहाच्या घोटाबरोबर सिगारेटचे झुरके घेणे आवडते. ही आरोग्याच्या दृष्टीने सर्वात वाईट सवय आहे. या प्रकारच्या लोकांमध्ये आरोग्याशी संबंधित बर्‍याच समस्या उद्भवू लागतात. आपल्याला देखील अशाच सवयी असतील, तर वेळीच थांबणे फायदेशीर ठरेल, अन्यथा आपल्याला अनेक गंभीर आजार होऊ शकतात. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, चहाबरोबर सिगारेटचे सेवन केल्यास कर्करोग होण्याची शक्यता कैकपटींनी वाढते.

असेही म्हटले जाऊ शकते की, या प्रकरणात कर्करोग होण्याची शक्यता 30 टक्क्यांनी वाढते. म्हणूनच, ही सवय नेहमीच टाळावी. कारण चहामध्ये कॅफिन आणि बरेच विषारी घटक उपस्थित असतात, जे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असतात. यामुळे कर्करोग अर्थात कॅन्सरसारखा घातक रोग देखील होऊ शकतो. म्हणून चहासह सिगारेटचे सेवन करण्याची सवय तत्काळ सोडा.

संशोधनात आढळल्या ‘या’ गोष्टी

एका संशोधनात असे आढळले आहे की, ग्रीन टी आणि धूम्रपान केल्याने लोकांमध्ये चिंता कमी झाली आहे. कारण, यामुळे न्यूरोट्रांसमीटर रिसेप्टरमध्ये डिस्टर्बन्स होतो. त्यामध्ये आढळणारा एल-थायनिन नावाचा अमीनो आम्ल चिंता-तणाव कमी करण्यास मदत करतो. एल-थायनाइन स्मरणशक्ती, लक्ष आणि एकाग्रता वाढवण्यात देखील मदत करतो. ग्रीन टी शरीरातील चयापचय वाढवते आणि चरबी कमी करते, ज्यामुळे आपले वजन देखील कमी होते. मात्र, सिगरेट आणि चहाच्या नियमित सेवनाने स्मृतीभंश देखील होऊ शकतो (Tea And Cigarette combination can cause cancer).

अति चहा सेवनाचे दुष्परिणाम

– तुम्ही सकाळी उठून उपाशी पोटी चहा पित असाल तर, प्रोस्टेट कॅन्सरसारखा गंभीर आजार होऊ शकतो. पुरुषांमध्ये याचे प्रमाण जास्त आढळते.

– उपाशी पोटी चहा घेण्याने अॅसिडिटी होऊ शकते.

– लोकांचा असा विश्वास आहे की, सकाळी चहा पिण्यामुळे शरीरात चपळता येते, परंतु हे चुकीचे आहे. रिकाम्या पोटी चहा घेतल्यामुळे दिवसभर थकवा येतो आणि चिडचिड होत.

– चहामध्ये भरपूर टॅनिन असते. रिकाम्या पोटी चहा घेतल्यामुळे कधीकधी उलट्या किंवा मळमळ होऊ शकते.

– अति चहा पिणे हृदयाच्या आरोग्यास हानिकारक आहे.

– चहाच्या अति सेवनाने आतड्यांवर परिणाम होतो.

– जास्त चहा पिण्यामुळे निद्रानाश होतो.

– चहाच्या अति सेवनाने कोलेस्ट्रोल आणि ब्लड प्रेशर वाढते.

(Tea And Cigarette combination can cause cancer)

हेही वाचा :