Corona Vaccination: प्रीकॉशनरी डोससंदर्भात मोठी बातमी! 18 वर्ष पूर्ण झालेल्यांना घेता येणार डोस, पण…

| Updated on: Apr 08, 2022 | 4:46 PM

18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींचे जर कोरोना लसीचे दोन्ही डोस झाले असतील, तर त्यांना आता प्रीकॉशनरी (Precautionary Dose) डोसही घेता येणार आहे.

Corona Vaccination: प्रीकॉशनरी डोससंदर्भात मोठी बातमी! 18 वर्ष पूर्ण झालेल्यांना घेता येणार डोस, पण...
7 ते 11 वयोगटासाठी कोवोव्हॅक्स लस वापरण्यास मंजुरी
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नवी दिल्ली : कोरोना लसीचे (Corona Vaccine) दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींचे जर कोरोना लसीचे दोन्ही डोस झाले असतील, तर त्यांना आता प्रीकॉशनरी (Precautionary Dose) डोसही घेता येणार आहे. खासगी लसीकरण केंद्रावर जाऊन 18 वर्षांवरील व्यक्तींना प्रॉकशनीर डोस घेता येईल, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry fo India) स्पष्ट केलं. दरम्यान, कोरोना लसीचे दोन्ही डोस झाल्यानंतर 9 महिने पूर्ण केलेल्यांनाच प्रीकॉशनरी डोस घेता येऊ शकेल. त्याचप्रमाणे सध्याच्या घडीला सुरु असलेलं सरकारी लसीकरण केंद्रांवरील लसीकरणही सुरुच राहणार आहे. मात्र सराकरी लसीकरण केंद्रावर कोविड प्रतिबंधक लसीचा प्रीकॉशनरी डोस हा सरकारनं घालून दिलेल्या नियमाप्रमाणे मर्यादित लोकांना मोफत देण्यात येतो आहे. त्याच प्रमाणे तो यापुढेही दिला जाईल, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

सध्या संपूर्ण देशभरात 60 वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा प्रीकॉशनरी डोस दिला जातो आहे. त्याचप्रमाणे आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांनाही कोरोना लसीचा प्रीकॉशनरी डोस दिला जातो आहे. कोरोनाचं संक्रमण वाढू नये, तसंच लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी, यासाठी खबरदारी म्हणून कोरोना लसीचा प्रतिबंधक डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

पाहा नेमकं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं काय म्हटलं?

कधीपासून घेता येणार?

सर्वसामान्य नागरिकांना खासगी लसीकरण केंद्रावर प्रीकॉशनरी डोस दिला जाईल. हा डोस 10 एप्रिलपासून खासगी लसीकरण केंद्रावर उपलब्ध करुन दिला जाणार असल्याचीही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.

शुक्रवारी किती रुग्णवाढ?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारूनुसार शुक्रवारी देशभरात 1,109 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,213 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात 43 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला देशभरात कोरोनाचे एकूण 11,492 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत एकूण 185 कोटी 38 लाख 88 हजार 663 इतक्या जणांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.

इतर बातम्या :

पन्नाशी ओलांडल्यानंतरही मिलिंद सोमणसारखं फिट राहायचंय? तर वाचा त्याने दिलेला हा लाखमोलाचा सल्ला

आता ज्या माणसाला मास्क वाटत असेल, त्याने लावावा आणि ज्याला वाटत नसेल त्यांना लावू नये

Pune Murder | चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीची हत्या, आत्महत्येचा बनाव, पोलिसांनी पितळ उघडं पाडलं