रोज कॅलरी बर्न करण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स, वजन कमी करण्यासाठी उत्तम पर्याय

| Updated on: Feb 23, 2021 | 3:35 PM

काही लोक तर डायटिंगपासून (Dieting) व्यायामापर्यंत (Workout) सगळे उपाय करतात. पण तरीदेखील अनेकदा वजन कमी होत नसल्याचं दिसतं. वजन कमी होण्यासाठी कॅलरिज बर्न (Calorie Count) होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे.

रोज कॅलरी बर्न करण्यासाठी फॉलो करा या टिप्स, वजन कमी करण्यासाठी उत्तम पर्याय
Follow us on

Tips for Weight Loss and Calorie Burn : वजन कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. काही लोक तर डायटिंगपासून (Dieting) व्यायामापर्यंत (Workout) सगळे उपाय करतात. पण तरीदेखील अनेकदा वजन कमी होत नसल्याचं दिसतं. वजन कमी होण्यासाठी कॅलरिज बर्न (Calorie Count) होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. (tips follow to weight loss and calorie burn everyday reduce weight )

जर तुम्ही लठ्ठपणामुळे त्रस्त असाल आणि वाढतं वजन नियंत्रित करू इच्छित असाल तर दररोज एक हजार कॅलरी बर्न करा. यासाठी काही खास टिप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. जास्त प्रमाणात कॅलरी घेतल्यामुळे शरीरात चरबी जमा होते. अतिरिक्त चरबी जाळण्यासाठी, दररोज योग्य दिनचर्या आणि कसरत करणं महत्वाचं आहे.

वजन उचला

वजन कमी करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे भार उचलन. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर दररोज वेटलिफ्टिंग करा. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते.

ट्रेडमिलवर चाला

वाढतं वजन नियंत्रणात आणण्यासाठी तुम्ही दररोज ट्रेडमिल किमान 1 तास चालवा. तुम्ही दररोज एक हजार कॅलरी बर्न करू शकता.

सायकल चालवा

तुम्ही दररोज 30 मिनिटं सायकल चालवून हजार कॅलरी बर्न करू शकता. आपण सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळी सायकल चालवू शकता.

पुरेशी झोप घ्या

हल्ली उशिरापर्यंत लोक इंटरनेटच्या जगात असतात. याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. जर तुम्हाला एका दिवसात एक हजार कॅलरी बर्न करायची असतील तर झोपेच्या नियमात सुधारणा करा. दररोज किमान 8 तास झोपा.

खूप पाणी प्या

तुम्ही जितकं जास्त पाणी प्याल तितकं जास्त कॅलरी बर्न कराल. सहसा डॉक्टर दररोज 3 ते 4 लिटर पाणी पिण्यासाठी सांगतात. म्हणून तुम्ही दररोज 3 ते 4 लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न केला पाहिजे. (tips follow to weight loss and calorie burn everyday reduce weight )

संबंधित बातम्या – 

Aging Signs | कमी वयातच शरीर वृद्धत्वाकडे झुकतंय? वेळीच ओळखा ‘ही’ लक्षणे!

Health care : गर्भावस्थेदरम्यान नोकरी देखील करताय? मग, अशाप्रकारे घ्या स्वतःची काळजी!

Fitness | वयाच्या 60व्या वर्षीही राहाल तंदुरुस्त, जाणून घ्या ‘या’ योगासनांबद्दल…

Health Care | गर्भावस्थेदरम्यान अपचन-गॅसच्या समस्यने त्रस्त? मग, ‘हे’ उपाय येतील कामी!

(tips follow to weight loss and calorie burn everyday reduce weight )