हृदय निरोगी ठेवायचे असेल तर डॉक्टरांचा हा सल्ला जरूर ऐका, आजारांपासून होईल बचाव

| Updated on: Oct 21, 2022 | 4:05 PM

लठ्ठपणा आणि मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका खूप जास्त असतो. त्याशिवाय ज्या लोकांना आधीच हृदयविकार आहे, त्यांनाही ॲटॅक येण्याची शक्यता अधिक असते.

हृदय निरोगी ठेवायचे असेल तर डॉक्टरांचा हा सल्ला जरूर ऐका, आजारांपासून होईल बचाव
Image Credit source: Freepik
Follow us on

गेल्या काही महिन्यांपासून देशभरात हार्ट ॲटॅक म्हणजेच हृदयविकाराचा झटका (heart attack) येण्याच्या केसेस खूप वाढल्या आहेत. स्वस्थ, निरोगी दिसणाऱ्या व्यक्तींनाही हार्ट ॲटॅक येत आहे. ज्यामुळे अनेक लोकांचा जागेवरच मृत्यूही (death) झाला. याआधीही अशा अनेक घटना (cases happened) घडल्या आहेत की, जिममध्ये डान्स करताना किंवा व्यायाम करताना हार्ट ॲटॅकने लोकांचा मृत्यू झाला.

खराब जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि कोविड व्हायरस यामुळे हृदयरोगाचे (heart disease) प्रमाण वाढत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. लहान वयातच अनेक व्यक्तींना हृदयरोग होत आहे. मात्र काही गोष्टींची काळजी घेतल्यास या धोकादायक आजाराला आळा घालता येऊ शकतो.

या आजाराच्या लक्षणांकडे लोकं वेळीच लक्ष देत नसल्यानेही हार्ट ॲटॅक येत आहेत, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. अशा अनेक प्रकरणांमध्ये संबंधित रुग्णाच्या हृदयामध्ये 60 ते 70 टक्के ब्लॉकेज असल्याचं दिसून येतं. हृदयरोगाची लक्षणेही दिसून येतात, पण लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. अशा परिस्थितीत धमन्यांमध्ये अडथळे वाढतात, यामुळे हृदयाचे कार्य सुरळीतपणे चालण्यास त्रास होतो आणि ॲटॅक येतो. अशावेळी दर तीन महिन्यांनी हृदयाची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी लिपिड प्रोफाइल टेस्ट आणि चेस्ट सीटी स्कॅनचा वापर केला जाऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

या लोकांना असतो जास्त धोका –

कार्डिओलॉजिस्ट डॉ. अजित कुमार यांच्या सांगण्यानुसार, लठ्ठपणा आणि मधुमेहाचा त्रास असलेल्या लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका खूप जास्त असतो. याशिवाय ज्या लोकांना आधीच हृदयविकार आहे, त्यांनाही म येण्याची शक्यता अधिक असते. गेल्या काही महिन्यांमध्ये हार्ट ॲटॅक तसेच कार्डिॲक अरेस्टच्या केसेस वाढत आहेत. हे हृदयविकाराच्या झटक्यापेक्षा जास्त धोकादायक असते. या आजारात हृदय अचानक काम करणे बंद होऊन रुग्ण दगावतो. अशावेळी हृदय निरोगी ठेवणं अत्यंत गरजेचे आहे.

असे ठेवा हृदय निरोगी –

– दररोज कमीत कमी 7 तास झोपावे.

– आहारात फॅट असलेले पदार्थ व जंक फूडचे सेवन करू नये.

– प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स व हिरव्या भाज्यांच सेवन करावे.

– आहारात बाजरीच्या भाकरीचा समावश करावा.

– आपल्या शरीराचे वजन आणि साखरेची पातळी नियंत्रणात ठेवावे.

– ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर नियमितपणे औषधे घ्यावीत.

 

ही आहेत हार्ट ॲटॅकची लक्षणे –

– छातीत खूप वेदना होणे.

– अचानक खूप घाम येणे .

– दम लागणे व छातीत गोळा आल्यासारखे वाटणे.

– डावा हात व खांदा दुखणे.