Health care : पन्नाशीतही हवे असतील स्ट्रॉंग स्नायू, तर आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

| Updated on: Aug 12, 2022 | 1:39 PM

युवा पिढीच्या तुलनेत मध्यमवयीन लोकांनी वजनाच्या हिशोबाने अधिक प्रमाणात प्रोटीनचे सेवन करणे गरजेचे असते. आज आम्ही तुम्हाला अशा 4 हाय प्रोटीन पदार्थांबद्दल सांगणार आहोत, ज्याचा समावेश तु्म्ही आहारात केल्यास पन्नाशीतही तुमच स्नायू बळकट राहतील.

Health care : पन्नाशीतही हवे असतील स्ट्रॉंग स्नायू, तर आहारात करा या पदार्थांचा समावेश
Follow us on

High-Protein Snacks in Your 50s : वाढत्या वयाचा तुमच्या शरीरावर परिणाम होत असतो. जसजसं वय वाढतं, तसं तुम्ही पूर्वीच्याच स्टॅमिनाने (less stamina) जीममध्ये वर्कआऊट अथवा व्यायाम करू शकत नाही. पूर्वीप्रमाणे खूप वेगाने धावणेही शक्य होत नाही. एकदा वयाची पन्नाशी ओलांडली, की तुम्हाला तुमचे स्नायू अधिक बळकट करण्यासाठी (Strong muscles) जास्त कष्ट करावे लागतात. मात्र यासाठी केवळ व्यायाम करणे पुरेसे नाही तर योग्य, पौष्टिक आहार घेणेही ( nourishing diet) तितकेच गरजेचे आहे. तुमच्या आहारात प्रोटीन्सचे (प्रथिने) प्रमाण वाढवणे, हे स्नायूंच्या बळकटीसाठी सगळ्यात महत्वाचे ठरते. नुकतेच एका लेखात छापून आले होते की, युवा पिढीच्या तुलनेत मध्यमवयीन लोकांनी वजनाच्या हिशोबाने अधिक प्रमाणात प्रोटीनचे सेवन करणे गरजेचे असते. तुमच्या शरीराच्या वजनानुसार, प्रत्येक किलो वजनामागे 0.8 ग्रॅम प्रोटीनचे सेवन करणे आवश्यक असते. वयाच्या पन्नाशीनंतर ( after 50 years of age) आहारातील प्रोटीनचे प्रमाण वाढवणे महत्वपूर्ण ठरते. आज आम्ही तुम्हाला अशा 4 हाय प्रोटीन पदार्थांबद्दल सांगणार आहोत, ज्याचा ५० वर्षांवरील लोकही त्यांच्या आहारात समावेश करू शकतील.

अंडी –
अंडं हे न्यूट्रीशन म्हणजे पोषणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे मानले जाते. मध्यम वयीन व्यक्ती रोजच्या आहारात अंड्याचा समावेश करू शकतात. त्यामध्ये 70 कॅलरीज, लोह, व्हिटॅमिन डी, झिंक ( जस्त) यासह अन्य 13 पोषक तत्वं असतात. तसेच अंड्यामध्ये हाय क्वॉलिटी प्रोटीन आणि ॲंटी-ऑक्सीडेंट्सही असतात, जे शरीरासाठी फायदेशीर ठरतात.

एडमामे –
एडमामे (Edamame) हा सोयाबीनचाच एक प्रकार असतो. ते तुम्ही एक वाटीभरून खाल्लंत तरी काही हरकत नाही. एक वाटी एडमामे अर्थात सोयाबीनमध्ये 18 ग्रॅम प्रोटीन आणि 190 कॅलरीज असतात. हे एक प्लांट बेस्ड प्रॉडक्ट असून सुपर मार्केटमध्ये ते सहज उपलब्ध असते.

ग्रीक योगर्ट –
ग्रीक योगर्ट हा दह्याचाच एक प्रकार असतो. मात्र ते दही थोडे जाड असते, त्याचे टेक्श्चर क्रीमी असते आणि त्यात पाण्याचा अंश जराही नसतो. ग्रीक योगर्टमध्ये प्रोटीनचे प्रमाण दुप्पट असते आणि साखरेचे प्रमाण नगण्य असते. १ कप नॉन फॅट ग्रीक योगर्टमध्ये 24 ग्रॅम प्रोटीन असते.

स्कीम्ड मिल्क –
एक कप स्कीम्ड मिल्कमध्ये 8 ग्रॅम हाय क्वॉलिटी प्रोटीन असते. हे स्कीम्ड मिल्क तुमचे स्नायू बळकट करण्यासाठी अतिशय फायदेशीर असते. वय वाढत असतानाही स्किम्ड मिल्कच्या सेवनामुळे स्नायू मजबूत व बळकट होण्यास मदत मिळते.
( टीप- या आर्टिकलमध्ये सुचवण्यात आलेले उपाय व दिलेले सल्ले हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. )