कोरोना अ‍ॅक्टिव्ह झालाय, कठोर पावलं उचला नाही तर…; केंद्राने दिला राज्यांना निर्वाणीचा इशारा

देशभरात कोरोनाचा कहर वाढला आहे. (Union government warns surge in Covid-19 cases can overwhelm resources)

कोरोना अ‍ॅक्टिव्ह झालाय, कठोर पावलं उचला नाही तर...; केंद्राने दिला राज्यांना निर्वाणीचा इशारा
home isolation
Follow us
| Updated on: Mar 31, 2021 | 10:22 AM

नवी दिल्ली: देशभरात कोरोनाचा कहर वाढला आहे. कोरोनाची ही दुसरी लाट अत्यंत धोकादायक आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. कोरोना आताच सक्रिय झालाय. तात्काळ कठोर उपाययोजना करा, नाही तर पायाभूत सुविधा उद्ध्वस्त होतील, असा इशाराच केंद्राने राज्यांना दिला आहे. (Union government warns surge in Covid-19 cases can overwhelm resources)

गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत मार्चमध्ये कोरोना 38 टक्क्याने वाढला आहे. कोरोना रेट पहिल्यांदा ऑक्टोबरनंतर 5 टक्क्यांच्यावर गेला आहे. कोरोना ज्या वेगाने वाढत आहे, त्यामुळे देशाच्या पायाभूत सुविधांना त्याचा मोठा फटका बसू शकतो, असं केंद्राने म्हटलं आहे.

टेन्शन वाढलं

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यांना तात्काळ रुग्णालयातील सुविधा वाढवणे आणि इंटेसिव्ह केअर वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच कोरोना रोखण्यासाठी कठोर पावलं उचलण्यासही सांगण्यात आलं आहे. गेल्या काही आठवड्यातच परिस्थिती खराब झाली आहे. ही चिंतेची बाब आहे. काही राज्यांनी टेन्शन वाढवलं आहे. अशावेळी कोणतंही राज्य किंवा जिल्हा चिंतेचं कारण बनता कामा नये, असं नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात पॉझिटीव्हीटी रेट 23 टक्के

हा कोरोना धोकादायक आहे. जेव्हा यावर नियंत्रण आणलं असं आपल्याला वाटतं तेव्हाच तो हल्ला करतो. केवळ आपल्याच नव्हे तर इतर देशातही हाच प्रकार पाहायला मिळाला आहे, असं पॉल म्हणाले. जिथे नॅशनल पॉझिटीव्हीटी रेट 5.65 टक्के आहे, तिथे महाराष्ट्रात हा रेट 23 टक्के आहे. पंजाबमध्ये 8.82 टक्के, मध्यप्रदेशात 7.82 टक्के, तामिळनाडूत 2.50 टक्के आणि कर्नाटकात 2.45 टक्के आहे.

जोरबैठका

कोरोनाचा कहर वाढल्याने केंद्र आणि राज्यांदरम्यान जौरबैठकांनाही सुरुवात झाली आहे. 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासोबत केंद्र सरकारची उच्चस्तरीय बैठक झाली. या राज्यांमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण असल्याने त्यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले. त्यात महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, तामिळनाडू, छत्तीसगड, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, पंजाब आणि बिहारचा समाशेवश आहे.

पाच पॉईंट्सवर फोकस करा

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय बैठक झाली. यावेळी पाच मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यात कोरोना टेस्टिंग वाढवा, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा, आयसोलेशन, लसीकरणाची संख्या वाढवा आणि क्लिनिकल ट्रीटमेंटवर लक्ष देण्यास सांगण्यात आलं आहे. (Union government warns surge in Covid-19 cases can overwhelm resources)

संबंधित बातम्या:

बीएमसी प्रशासन दक्षता घेतंय, मुंबईकरांनी घाबरुन जावू नये : महानगरपालिका आयुक्‍त चहल

Pune Corona Update : पुणे देशात अव्वल, समूह संसर्गाच्या उंबरठ्यावर

कोरोनाची दुसरी लाट अधिक धोकादायक कशी?; 10 मुद्द्यांतून समजून घ्या!

(Union government warns surge in Covid-19 cases can overwhelm resources)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.