AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Corona Update : पुणे देशात अव्वल, समूह संसर्गाच्या उंबरठ्यावर

सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असलेलं पुणे शहर कोरोनाच्या समूह संसर्गाच्या उंबरठ्यावर आहे.

Pune Corona Update : पुणे देशात अव्वल, समूह संसर्गाच्या उंबरठ्यावर
corona virus news
| Updated on: Mar 30, 2021 | 6:02 PM
Share

पुणे : सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असलेलं पुणे शहर कोरोनाच्या समूह संसर्गाच्या उंबरठ्यावर आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात दररोज सरासरी 6 ते 8 हजार कोरोना बाधितांची भर पडतीये. त्यामुळे नागरिकांमधून काळजी व्यक्त केली जातेय. प्रशासनाकडूनही सतर्कता बाळगत कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना जाहीर केल्या जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यात कोरोना वाढीची नेमकी काय कारणं याचा हा आढावा (Increase in Corona Patient in Pune possibility of community infection).

पुण्यात एकाच कुटुंबातील व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होताना दिसत आहे. त्यामुळेच पुण्यात क्लस्टर इन्फेक्शनला सुरुवात झाल्याचं निरिक्षण नोंदवलं जातंय. होम आयसोलेशनमधील लोकांकडून कोरोना नियमांची पायमल्ली होत असल्यामुळेच हे परिणाम दिसत असल्याचंही बोललं जातंय. अनेक जण कोरोना संसर्गानंतरही डॉक्टरांकडे जातच नसल्याचंही समोर येतंय. डॉ. अविनाश भोंडवे यांनी देखील याला दुजोरा देत आपली निरिक्षणं नोंदवली आहेत.

पुणे जिल्ह्यात सध्या एकूण 59 हजार 9003 अॅक्टिव्ह रुग्ण

पुणे शहरात सद्यस्थितीत 32 हजार 875 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, तर 674 रुग्ण गंभीर अवस्थेत आहेत. संपूर्ण पुणे जिल्ह्यात सध्या एकूण 59 हजार 9003 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पुणे शहराचा मृत्यूदर 2.7 टक्के, तर जिल्ह्याचा मृत्यूदर हा 2.01 टक्के झाला आहे. त्यामुळे पुणेकरांच्या काळजीत भर पडलीय.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या हद्दीतील हॉटस्पॉट

वाघोली शिक्रापूर हिंजवडी मंचर

जिल्ह्यातील नगरपालिका हद्दीतील हॉटस्पॉट

बारामती तळेगाव दौंड सासवड

जिल्ह्यातील महापालिका हद्दीतील हॉटस्पॉट

हडपसर धनकवडी औंध नगररोड

महापालिका शहरातील खासगी हॉस्पिटलचे 80 टक्के बेड ताब्यात घेणार

पुणे शहरात सध्या जवळपास सरकारी आणि खासगी सर्व रुग्णायलातील बेड फुल्ल झालेत. त्यामुळं महापालिका शहरातील खासगी हॉस्पिटलचे 80 टक्के बेड ताब्यात घेतीये. तसे आदेशही महापालिकेनं खासगी हॉस्पिटलला दिलेत. पुण्याच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी याबाबत माहिती दिली.

सोसायट्यांमध्ये कोरोना रुग्णांना त्रास देण्याचे धक्कादायक प्रकार

पुणे शहरात मोठ्या सोसायट्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. शहरातील 207 सोसायट्या मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्यात. तर अनेक सोसायट्यांमध्ये कोरोना रुग्णांना त्रास देण्याचे धक्कादायक प्रकारही घडतायेत.

एकंदरीतच पुणे जिल्हा हा कोरोनाच्या समूह संसर्गाच्या उंबरठ्यावर आहे. तरीही अनेक नागरिक बेफिकीरपणे वागत आहे. त्यामुळेच पुण्यात लॉकडाऊन अटळ आहे एवढं निश्चित दिसत आहे.

हेही वाचा :

Pune Corona Update : पुण्यात कोरोनाचा कहर, प्रमुख रुग्णालयांमध्ये मात्र बेड्सची कमतरता!

Pune Corona Update : पुणेकरांची चिंता वाढली, कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यूच्या प्रमाणात मोठी वाढ! लॉकडाऊन होणार?

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता, खासगी रुग्णालयांकडून बेड राखीव ठेवण्यास नकार

व्हिडीओ पाहा :

Increase in Corona Patient in Pune possibility of community infection

मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.