AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीएमसी प्रशासन दक्षता घेतंय, मुंबईकरांनी घाबरुन जावू नये : महानगरपालिका आयुक्‍त चहल

राज्याची राजधानी मुंबईत वाढत्या कोरोना रुग्णांनी प्रशासनासह नागरिकांचीही काळजी वाढवलीय.

बीएमसी प्रशासन दक्षता घेतंय, मुंबईकरांनी घाबरुन जावू नये : महानगरपालिका आयुक्‍त चहल
iqbal chahal
| Updated on: Mar 30, 2021 | 9:09 PM
Share

मुंबई : राज्याची राजधानी मुंबईत वाढत्या कोरोना रुग्णांनी प्रशासनासह नागरिकांचीही काळजी वाढवलीय. रुग्णांची संख्या वाढल्याने रुग्णालयात बेड पुरणार की नाही अशीही काळजी नागरिकांमधून व्यक्त केली जातेय. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल यांनी आज (30 मार्च) नागरिकांना बेड कमी पडणार नाही, असं आश्वासन दिलंय. बीएमसी प्रशासन बेडची व्यवस्था करण्यासाठी पूर्ण दक्षता घेतंय, मुंबईकरांनी घाबरुन जाऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं. ते सकाळी वांद्रे-कुर्ला संकूलातील भव्‍य कोविड केंद्रात कोविड-19 प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. यावेळी बोलत होते (BMC Commissioner Iqbal Chahal assure availability of Bed for Corona patient).

इकबाल चहल म्हणाले, “सद्यस्थितीत मुंबईत कोविड रुग्‍णांसाठी राखीव असलेल्‍या रुग्‍णशय्यांपैकी सुमारे 3 हजार रुग्‍णशय्या (बेड) रिक्‍त आहेत. यात खासगी रुग्‍णालयातील 450 बेडचाही समावेश आहे. थोडक्‍यात रुग्‍णशय्यांची कोणतीही कमतरता नाही. यापुढेही कमतरता भासणार नाही, याची सर्वतोपरी दक्षता महानगरपालिका प्रशासन घेत आहोत. नागरिकांनी घाबरुन जावू नये. रुग्‍णांनी व त्‍यांच्‍या नातेवाईकांनी आपापल्‍या विभागातील वॉर्ड वॉर रुमशी संपर्क साधला की त्‍यांना आवश्‍यकतेनुसार बेड पुरवला जाईल.”

“…म्‍हणून रुग्‍णांनी व नागरिकांनी घाबरुन जाऊ नये”

“महानगरपालिकेच्‍या जम्‍बो कोविड सेंटर्स तसेच खासगी रुग्‍णालयात 80 टक्‍के रुग्‍णशय्या पुन्‍हा कोविड रुग्‍णांसाठी सक्रिय केल्‍या जात आहेत. मुंबईत 10 फेब्रुवारी 2021 रोजी 3 हजार 500 इतकी रुग्‍णशय्या व्‍याप्‍ती होती. आता 9 हजार 900 रुग्‍णशय्यांवर रुग्‍ण आहेत. त्यापैकी 8 हजार 400 मुंबईतील तर 1 हजार 500 मुंबई महानगर प्रदेशातील आहेत. याचाच अर्थ मागील 48 दिवसांत एकूण बाधितांच्‍या संख्‍येच्‍या तुलनेत फक्‍त 5 हजार बेड रुग्‍णांसाठी आवश्‍यक भासले. म्‍हणून रुग्‍णांनी व नागरिकांनी घाबरुन जाऊ नये,” असं आवाहन आयुक्‍तांनी केलं.

“रुग्‍णशय्यांची क्षमता वाढवून एकूण 20 हजारापेक्षा जास्त”

रुग्‍णशय्या वाढीबाबत चहल म्‍हणाले, “सध्‍याची रुग्‍णशय्यांची क्षमता वाढवून ती एकूण 20 हजारापेक्षा जास्त इतकी करण्‍यात येत आहे. दर आठवड्याला टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने याप्रमाणे ही संख्‍या वाढवण्‍यात येत आहे. जून ते नोव्‍हेंबर 2020 या कालावधीत महानगरपालिकेकडे ताब्‍यात असलेली खासगी लहान रुग्‍णालयांची सुमारे 2 हजार 269 रुग्‍णशय्या क्षमता महानगरपालिकेने आता पुन्‍हा ताब्‍यात घेतली आहे. ‍यामध्‍ये 360 अतिदक्षता उपचारांसाठी आहेत.”

“मुंबईत 35 मोठ्या रुग्‍णालयांमधील 4 हजार 800 बेड कोविड रुग्‍णांसाठी उपलब्ध”

“मुंबईतील 35 मोठ्या रुग्‍णालयांमध्‍ये मिळून 4 हजार 800 बेड कोविड रुग्‍णांच्‍या उपचारांसाठी उपलब्‍ध होते. कोविड संसर्ग मध्‍यंतरी नियंत्रणात आल्‍यानंतर सर्व मिळून 2 हजार 350 रुग्‍णशय्या इतर आजारांवरील उपचारांसाठी उपलब्‍ध करुन देण्‍यात आले होते. संसर्ग वाढत असल्‍याने आता पुन्‍हा 4 हजार 800 ही मूळ कोविड रुग्‍णशय्या क्षमता गाठण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या आहेत. म्‍हणजेच, लहान व मोठे खासगी रुग्‍णालये मिळून 7 हजार रुग्‍णशय्या कोविड रुग्‍णांसाठी उपलब्‍ध होतील,” असे आयुक्‍तांनी स्‍पष्‍ट केले.

“वाढती रुग्‍णसंख्‍या रोखण्‍यासाठी प्रशासन, सरकार सर्वतोपरी प्रयत्‍न करीत आहेच, मात्र त्‍याला नागरिकांकडून संपूर्ण सहकार्य मिळणे देखील तितकेच आवश्‍यक आहे. मुंबईत सध्‍या रात्रीची संचारबंदी लागू आहे. येत्‍या काही दिवसांत कोविड-19 संसर्गाची परिस्थिती पाहून आगामी काळाचे नियोजन ठरवण्‍‍यात येईल. निर्बंधांचे योग्‍य पालन सर्व घटकांनी करावे,” असेही अखेरीस चहल यांनी नमूद केले.

हेही वाचा : 

अरे देवा! भारतात कोरोना पुन्हा पीक पॉईंटला; एका दिवसातील सर्वाधिक वाढ, 60 टक्के रुग्ण महाराष्ट्रात

घराबाहेर पडण्यापूर्वी वयाचा विचार करा, ‘या’ वयोगटातील व्यक्तींना कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग

Maharashtra Night Curfew मोठी बातमी : राज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी

व्हिडीओ पाहा :

BMC Commissioner Iqbal Chahal assure availability of Bed for Corona patient

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.