नव्या कोरोना लसीचा धसका?, थांबा..! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला बघा, निर्णय घ्या!

| Updated on: Dec 22, 2020 | 10:28 AM

कोरोना लसीवरून सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांमुळे अमेरिकेतही भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे देशातील जनतेच्या मनातील भीती दूर करण्यासाठी अमेरिकेचे नव निर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी स्वत: लस टोचून घेतली. (US President Joe Biden publicly receives COVID-19 vaccine)

नव्या कोरोना लसीचा धसका?, थांबा..! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला बघा, निर्णय घ्या!
Follow us on

वॉशिंग्टन: कोरोना लसीवरून सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांमुळे अमेरिकेतही भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे देशातील जनतेच्या मनातील भीती दूर करण्यासाठी अमेरिकेचे नव निर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी स्वत: लस टोचून घेतली. एवढेच नव्हे तर 78 वर्षीय बायडेन यांनी लस टोचून घेतानाचं थेट प्रेक्षपणही केलं. अमेरिकेत आजपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली आहे, जनतेच्या मनात भीती निर्माण होऊ नये म्हणूनच बायडेन यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तुम्हीही कोरोना लसीला घाबरत असाल तर मनातील भीती काढून टाका. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला पाहा आणि निर्णय घ्या! (US President Joe Biden publicly receives COVID-19 vaccine)

फायझर बायोएनटेक कंपनीची कोरोना लस बायडेन यांनी टोचून घेतली. क्रिस्टियाना केअर रुग्णालयात जाऊन त्यांनी लस घेतली. त्याचं थेट प्रसारण करण्यात आलं. लस उपलब्ध झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरणासाठी पूर्णपणे तयार राहिलं पाहिजे. लस टोचून घेण्याच्या विचारानं चिंताग्रस्त होण्याची गरज नाही, असं बायडेन म्हणाले. क्रिस्टियाना केअर रुग्णालयाच्या नर्स ताबा मासा यांनी त्यांना लस टोचली.

संशोधकांचे आभार

लस टोचून घेतल्यानंतर बायडेन यांनी ट्विट करून आभार मानले आहेत. आज मी कोविड-19ची लस टोचून घेतली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ही लस शोधून काढणाऱ्या संशोधक आणि वैज्ञानिकांचं आभार. संशोधकांनी अत्यंत कमी वेळात आणि अत्यंत चिकाटीने मेहनत घेऊन ही लस शोधली. त्याबद्दल आम्ही सर्व तुमचे आभारी आहोत. अमेरिकेतील नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही. लस जसजशी उपलब्ध होईल तुम्ही सर्वांनी लस टोचून घ्या, असं आवाहनही बायडेन यांनी देशवासियांना केलं आहे. (US President Joe Biden publicly receives COVID-19 vaccine)

 

कमला हॅरिसही लस टोचून घेणार

बायडेन यांनी लस टोचून घेतल्यानंतर अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस या सुद्धा पुढच्या आठवड्यात लस टोचून घेणार आहेत. त्यांनी ट्विट करून त्याची माहिती दिली आहे. नेत्याने असंच काम करायला हवं, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. (US President Joe Biden publicly receives COVID-19 vaccine)

संबंधित बातम्या:

कोरोनाच्या नव्या घातक प्रजातीवर जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा, युरोपीय देशांना विशेष सूचना

केईएम, शीव, कूपर, नायरसह 8 ठिकाणी लसीकरण केंद्रे; वाचा मुंबईत कुठे, कसे होणार लसीकरण!

ब्रिटनमध्ये कोरोना स्ट्रेनचा कहर सुरु; कुठल्या देशात काय बंद? भारतात काय परिस्थिती?

(US President Joe Biden publicly receives COVID-19 vaccine)