तुमच्याही योनीतून येत आहे दुर्गंधी, हे कारण आहे का?, जाणून घ्या याबद्दल सविस्तर!

| Updated on: Dec 31, 2021 | 12:14 PM

बऱ्याच वेळा योनीतून एक विचित्र दुर्गंधी येते. मात्र, आपल्यापैकी बऱ्याचजणी या दुर्गंधीकडे सर्रास दुर्लक्ष करतात. याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा याची कारणे जाणून घेऊन आपण यावर उपचार करणे खूप गरजेचे आहे. विशेष म्हणजे आपण घरगुती उपाय देखील करू शकता.

तुमच्याही योनीतून येत आहे दुर्गंधी, हे कारण आहे का?, जाणून घ्या याबद्दल सविस्तर!
सांकेतिक फोटो
Follow us on

मुंबई : बऱ्याच वेळा योनीतून (Vaginal) एक विचित्र दुर्गंधी (Stinky) येते. मात्र, आपल्यापैकी बऱ्याचजणी या दुर्गंधीकडे सर्रास दुर्लक्ष करतात. याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा याची कारणे जाणून घेऊन आपण यावर उपचार करणे खूप गरजेचे आहे. विशेष म्हणजे आपण घरगुती उपाय देखील करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात योनीतून दुर्गंधी येण्याची कारणे, त्यावर उपाय आणि घरगुती उपचार.

1. गुप्तांगाला खाज सुटणे आणि लघवी करताना त्रास

जर तुम्हाला ट्रायकोमोनियासिस सारख्या STI चा त्रास होत असेल तर, हे योनीतून दुर्गंधीचे एक प्रमुख कारण असू शकते. जेव्हा ट्रायकोमोनास योनिनालिस नावाचा प्रोटोझोअन परजीवी संभोग दरम्यान प्रसारित होतो तेव्हा हे घडते. हे सामान्य आहे आणि कोणालाही होऊ शकते. विशेष म्हणजे हे यामध्ये गुप्तांगात खाज सुटणे आणि लघवी करताना आपल्याला त्रास देखील होतो.

2. बॅक्टेरियाच्या वाढीमुळे देखील दुर्गंधी पसरते

बॅक्टेरियल वेजिनोसिस म्हणजेच BV हे योनीतून दुर्गंधी येण्याचे मुख्य कारण असू शकते. योनीच्या गंधाव्यतिरिक्त BV मुळे खाज सुटते आणि पातळ पांढरा, पिवळा स्त्राव होतो. जर आपल्यालाही ही समस्या असेल तर आपण शक्यतो तितक्या लवकर डाॅक्टरांकडे जाऊन उपचार घेतले पाहिजेत.

3. योग्य आहार घेणे खूप महत्वाचे

आपल्या आरोग्याच्या बऱ्याच समस्या आपण आपल्या आहारातून बऱ्या करू शकतो. तुमची नैसर्गिक पीएच पातळी संतुलित असेल तर तुम्हाला दुर्गंधी येण्याची शक्यता कमी आहे. तुमचा आहारामध्ये कडधान्य, जीवनसत्त्वे आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. यामुळे योनीतून दुर्गंधी येण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल.

4. घामामुळे देखील दुर्गंधी होण्याची शक्यता

व्यायाम केल्यानंतर किंवा उन्हाळ्याच्या हंगामात आपल्याला जास्त प्रमाणात घाम येतो. योनिमार्गात घाम येतो तेव्हा तेथे एक वास येतो. योनीजवळील घामाचा वास टाळण्यासाठी स्वच्छा करणे खूप महत्वाचे आहे. वास आल्यानंतर आपण शक्यतो कपडे बदलले पाहिजेत. तसेच जर हा घामाचा वास जास्त वाढत असेल तर आपण डाॅक्टरांशी संपर्क करावा. navbharat times ने यासंदर्भात रिपोर्ट दिला आहे.

(टीप: या बातमीतील मजकूर प्राथमिक माहितीवर आधारित आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या)

संबंधित बातम्या : 

work from home | मुलांसोबत राहून कठीण जातोय वर्क फ्राम होम; या पाच टिप्स तुमचे काम करतील सोपे

pedicure | पेडिक्युअर झाल्यानं कापावा लागला पाय; सलूनकडून महिलेला मिळाली 13 कोटींची नुकसानभरपाई!