काय आहे कोलीन?, मशरुमपासून अंड्यापर्यंत सर्वात असते, ‘ब्रेन मेमरी सेंटर’चा विकास करते
कोलीन हे चयापचय, न्यूरोट्रांसमीटर संश्लेषण, मेंदूचा विकास आणि अनेक शारीरिक प्रक्रियांसाठी आवश्यक असलेले पोषक द्रव्य आहे. आपले शरीर नैसर्गिकरित्या काही पोषक तत्वे बनवितात, परंतु ते तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशा नसतात. म्हणून तुम्हाला तुमच्या आहारातून काही प्रमाणात पोषक द्रव्य मिळणे आवश्यक आहेत.

कोलीन ( choline ) हा महत्वाचा पोषक घटक अंड्यामध्ये असतो. त्याच्यामुळे मेंदूतील स्मृती केंद्राचा विकास होतो. कोंबडीच्या अंड्यांमध्ये आढळणारे मुख्य पोषक तत्व कोलीन म्हणजे काय? अंड्यांमध्ये आढळणारे कोलीन हा एक महत्त्वाचा पोषक घटक आहे. ज्यामुळे मेंदूच्या स्मृती केंद्राच्या विकासास मदत होते, असे पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने म्हटले आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या म्हणण्यानुसार, हे मूड्स, स्नायूंचे नियंत्रण आणि शरीरातील पेशींच्या सभोवतालची पडदा तयार करण्यात मदत करते. कोलीन हा पोषक घटक मांस, मासे, बटाटे, फुलकोबी इत्यादींमध्ये देखील आढळतो. नेमका कोणत्या पदार्थात किती कोलीनचे प्रमाण असते हे पाहूयात…
प्रौढ पुरुष आणि स्त्रियांना दररोज अनुक्रमे 550 मिलीग्राम आणि 425 मिलीग्राम कोलीनची आवश्यकता असते. परंतू त्याप्रमाणात हे पोषक द्रव्य आपल्या शरीरात जात नाही. त्यामुळे आपले पोषण नीट होत नाही. कोलीन हे गर्भाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी महत्त्वाचे असल्याने, गर्भधारणेदरम्यान आणि स्तनपानादरम्यान या पोषक तत्वाची गरज वाढते. अशा प्रकारे, गरोदर महिलांना दररोज 450 मिलीग्राम कोलीनची आवश्यकता असते, तर ज्या बाळाला स्तनपान करीत आहेत त्यांना 550 मिलीग्राम कोलीनची आवश्यक असते.
अख्ख्या अंड्यात कोलीन –
अंडी हे कोलीनच्या सर्वोत्तम स्त्रोतांपैकी एक आहे, एक अंडे 147 मिलीग्राम कोलीन पुरवते. याचा अर्थ असा की दररोज फक्त 2 अंडी खाल्ल्याने आपल्या शरीराची कोलीनची पूर्तता होते. अंड्यातील कोलीनचे प्रमाण जवळजवळ संपूर्णपणे अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये केंद्रित असते. खरं तर, प्रति 100 ग्रॅम अंड्यातील पिवळं बलक विरुद्ध 1 मिग्रॅ प्रति 100 ग्रॅम अंड्यातील पांढऱ्यामध्ये 680 मिलीग्राम पोषक तत्वं असतात, ज्यामुळे जास्तीत जास्त कोलीन मिळविण्यासाठी संपूर्ण अंडं खाणे महत्त्वाचे ठरते.अंड्यांमधील नैसर्गिक कोलीन हे आहारातील पूरक पदार्थांमध्ये आढळणाऱ्या पोषक तत्वांपेक्षा चांगले शोषले जाऊ शकते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
येथे पाहा पशसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाचे ट्वीट –
Eggs: Fuel for Thought! Did you know? Choline, a key nutrient found in eggs, is vital in developing the brain’s memory center. #EggBenefits #HealthyLiving #BalancedNutrition pic.twitter.com/RbNbFCcQmS
— Dept of Animal Husbandry & Dairying, Min of FAH&D (@Dept_of_AHD) May 25, 2024
माशांची अंडी –
फिश रो किंवा कॅविअर हा देखील कोलीनचा उत्कृष्ट स्रोत आहे. कॅविअर म्हणजे स्टर्जियन माशांची अंडी होय. फक्त 85 ग्रॅम मिश्र-प्रजातीच्या कॅविअरमध्ये 285 मिलीग्राम कोलीन असते, ही अत्यंत महागडी डीश असते.
सी फूड –
सॅल्मन, ट्यूना आणि कॉड सारख्या माशांसह सीफूडमध्ये कोलीन भरपूर असते. उदाहरणार्थ, 85 ग्रॅम सॅल्मन माशांत एकूण 187 मिग्रॅ कोलीन असते. जे लोक कमी मासे खातात त्यांच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी असते काही अभ्यासांमध्ये म्हटले आहे.
शिताके मशरूम –
शिताके मशरुममध्ये ( Shiitake mushroom ) कोलीन पोषक तत्वांचा भरमार असते आणि हा वनस्पती आधारित कोलीनचा एक उत्तम स्रोत आहे. एक कप ( 145 ग्रॅम ) शिजलेल्या शिताके मशरूम 116 मिग्रॅ, किंवा तुमच्या दैनंदिन गरजांच्या 21% पोषण पुरवते.
सोयाबीन –
सोयाबीन हा वनस्पती-आधारित कोलीनचा आणखी एक समृद्ध स्रोत आहे. एक कप ( 93 ग्रॅम ) भाजलेल्या सोयाबीनमध्ये 214 मिग्रॅ, किंवा 39% पोषण पुरवित असते. सोयाबीनमध्ये प्रथिने, फायबर, मँगनीज, मॅग्नेशियम, जस्त आणि फोलेट चांगला स्रोत आहे.
फळ भाज्या –
फुलकोबी, ब्रोकोली आणि ब्रसेल्स स्प्राउट्स सारख्या काही भाज्यांमध्ये देखील कोलीन भरपूर असते. शिजवलेल्या फुलकोबीचा एक कप (160 ग्रॅम) 72 मिलीग्राम किंवा तुमच्या दैनंदिन गरजेच्या 13% कोलीन पुरवितो, तर त्याच प्रमाणात शिजवलेले ब्रुसेल्स स्प्राउट्स आणि ब्रोकोली प्रत्येकी 30 मिलीग्राम, किंवा 5% तुमच्या रोजच्या गरजा पुरवतात.