नवी दिल्ली : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर (Corona virus) देशभरात कोरोना लसीकरणाची मोहिम सुरु आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी व्यापक पातळीवर लसीकरणाचा निर्णय घेत सरकारने आता देशातील 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरणाचा निर्णय घेतलाय (Vaccination). 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरणासाठी नोंद करता येणार आहे. यासाठी Co-Win या प्लॅटफॉर्म आणि आरोग्य सेतू अॅपवर (Arogya Setu app) 28 एप्रिलपासून नोंदणी सुरु होणार आहे. पहिल्यांदाच देशात सरकारी आणि खासगी रुग्णालयं कोरोना लस स्वतंत्रपणे खरेदी करुन लसीकरण करतील (What is different between Covaxin and Covishield what are prices).