पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील लसीकरण आणि ऑक्सिजनसह इतर वैद्यकीय सामग्रीच्या पुरवठ्याविषयी महत्त्वाची माहिती दिलीय. तसेच महाराष्ट्रातील 18 वर्षावरील नागरिकांना महाराष्ट्र दिनी मोफत लसीचं गिफ्ट मिळणार असल्याचे संकेत पवारांनी दिलेत. याशिवाय कोरोना लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढणार असल्याचंही ते म्हणाले (Ajit Pawar comment on Corona Vaccination for citizens above 18 years in Maharashtra).