अजित पवारांनी झोप कमी करावी, झेपत नसेल तर पुण्याचं पालकमंत्रीपद सोडा: चंद्रकांत पाटील

अजित पवारांनी झोप कमी करावी, झेपत नसेल तर पुण्याचं पालकमंत्रीपद सोडा: चंद्रकांत पाटील
अजित पवार आणि चंद्रकांत पाटील

पुण्यात कोरोना परिस्थिती हाताबाहेर जात असताना पालकमंत्री जिल्ह्याला वेळ देत नाहीत. | Ajit Pawar Chandrakant Patil

Rohit Dhamnaskar

|

Apr 21, 2021 | 12:53 PM

पुणे: अजित पवार यांना पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी झेपत नसेल तर त्यांनी हे पद सोडावं, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली. कोरोनाच्या संकटकाळात अजित पवार (Ajit Pawar) उपलब्ध नाहीत. ते सध्या आहेत तरी कुठे, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. (BJP leader Chandrkant Patil slams NCP DCM Ajit Pawar)

ते बुधवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या संभाव्य लॉकडाऊनच्या निर्णयाला विरोध केला. यावेळी त्यांनी पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांच्यावर टीकेची तोफ डागली. पुण्यात कोरोना परिस्थिती हाताबाहेर जात असताना पालकमंत्री जिल्ह्याला वेळ देत नाहीत. फोनवरही ते नागरिकांना उपलब्ध होत नाहीत. अजित पवार यांनी आता त्यांची झोप कमी करून पुण्यात लक्ष द्यायला हवं. पुणे जिल्ह्यात लक्ष घालायला त्यांना वेळ नसेल तर पुण्याचा पालकमंत्री बदला, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यामुळे आता अजित पवार या टीकेला काय प्रत्युत्तर देतात, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

‘मला पुन्हा ‘चंपा’ बोललात तर याद राखा’

गेल्या काही दिवसांपासून पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक लढाया रंगताना दिसत आहेत. अजित पवार यांनी पंढरपूरच्या सभेत ‘चंपा’ या संबोधनावरून चंद्रकांत पाटील यांना डिवचले होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना निर्वाणीचा इशारा दिला होता.

अजित पवार यांनी मला ‘चंपा’ बोलणं थांबवावं, अन्यथा मी तुमच्या मुलांपासून सर्वांचे शॉटफॉर्म करेन, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिला. अजित पवारांना (Ajit Pawar) मला एक इशारा द्यायचा आहे. खूप दिवस मला ‘चंपा’ म्हणणं त्यांच्या लोकांनी थांबवलं होतं. कारण मी बोलायला लागलो तर महागात पडेन असं सांगितलं होतं. आता हे थांबलं नाही तर त्यांचेसुद्धा जे शॉर्ट फॉर्म आहेत, त्यांच्या मुलापासून सर्वांचे शॉर्ट फॉर्म मला करावे लागतील, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.

महाराष्ट्रात पुनश्च: कडकडीत लॉकडाऊन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच घोषणा करणार?

राज्यात कोरोनाचा हाहा:कार पाहायला मिळत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने राज्यातील लॉकडाऊनचे नियम आणखी कठोर केले जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रात आज कडकडीत लॉकडाऊनची घोषणा करतील, अशी चर्चा आहे.

संबंधित बातम्या : 

शेवटचे गुड मॉर्निंग, कोरोनाने निधनापूर्वी मुंबईतील महिला डॉक्टरची फेसबुक पोस्ट

PM Narendra Modi Live | लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय म्हणून वापरावा- मोदी

Coronavirus: ‘महाराष्ट्रातील परिस्थिती हाताबाहेर; पंतप्रधान मोदींनी राज्यात आणीबाणी लावावी’

(BJP leader Chandrkant Patil slams NCP DCM Ajit Pawar)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें