PM Narendra Modi Live | लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय म्हणून वापरावा- मोदी

पंतप्रधान नेरंद्र मोदी आज रात्री 8.45 वाजता देशला संबोधित करणार (pm narendra modi to address nation at 8 45 pm on corona crisis lockdown update today )

PM Narendra Modi Live | लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय म्हणून वापरावा- मोदी
narendra modi

| Edited By: Nupur Chilkulwar

Apr 21, 2021 | 6:43 AM

नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट, वाढते रुग्ण या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधला. यावेली त्यांनी लॉकाडऊन हा अगदी शेवटचा पर्याय म्हणून वापरावा असे देशातील राज्यांना सांगितले.  “कठीण काळात धैर्य सोडू नये. कोणत्याही कठीण काळात योग्य निर्णय घ्यावा, योग्य प्रयत्न करावे, तरच आपण विजय मिळवू शकतो. याच ध्येयाने देश दिवस रात्र काम करत आहे. गेल्या काही दिवसात जे निर्णय घेतले, त्यामुळे स्थिती सुधारेल. कोरोना संकटात ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. केंद्र आणि राज्य सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे. ऑक्सिजन आवश्यक आहे त्यांना मिळायलाच हवा. राज्यांमध्ये नवे प्लांट सुरु केले जात आहेत, औद्योगिक ऑक्सिजन मेडिकलमध्ये रुपांतरीत, ऑक्सिजन रेल्वे असे प्रत्येक प्रयत्न सुरु आहेत. देशातील फार्मा कंपन्यांनी औषधांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवलं. ते आणखी वेगवान केलं जात आहे,” असं मोदी म्हणाले.   (pm narendra modi to address nation at 8 45 pm on corona crisis lockdown update today)

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 20 Apr 2021 09:12 PM (IST)

  ‘देशाला लॉकडाऊन पासून वाचवायचं आहे’

  “माझी तरुणांना विनंती आहे. त्यांनी आपल्या सोसायटी, परिसरात छोटी कमिटी बनवून कोव्हिड नियम लागू करण्यासाठी मदत करावी. आपण तसं केलं तर लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता लागणार नाही. स्वच्छता अभियानसाठी पाचवी ते दहावीच्या बालमित्रांनी खूप मदत केली होती. त्यांनी घरच्यांना आणि लोकांना स्वच्छतेचा संदेश दिला होता. आज त्यांना मी विनंती करतो, घरात असं वातावरण तयार करा की, घरातील लोक विनाकारण घराबाहेर पडू नये. प्रसारमाध्यामांनीही लोकांना सतर्क करण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न आणखी वाढवावे. तसेच लोकांमध्ये भीती आणि अफवा वाढू नये. याची काळजी घ्यायची आहे. आपल्याला देशाला लॉकडाऊनपासून वाचवलायचं आहे. राज्यांनी शेवटच पर्याय म्हणून लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा”, असं पंतप्रधान म्हणाले

 • 20 Apr 2021 09:01 PM (IST)

  लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय म्हणून वापरावा- मोदी

  नवी दिल्ली  : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत आहेत. मागिल लाटेतील परिस्थिती वेगळी होती. मागील वेळी आपल्याकडे कोरोनाशी लढण्यासाठी उपयुक्त सुविधा नव्हत्या. आपल्याकडे पीपीई कीट नव्हत्या, लॅब नव्हत्या. मात्र आज कमी काळात आपण सगळं काही तयार केलं. आज आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पीपीई कीट आहेत. टेस्टींगसुद्धा आपण वाढवत आहोत. आतापर्यंत आपण कोरोनाचा लढा मोठ्या धैर्याने समोर नेलेलाला आहे. शिस्त आणि धीर धरुन आपण कोरोना लढा इथपर्यंत आणला आहे.

  … तर लॉकडाऊनचा प्रश्नच येणार नाही

  मी सगळ्यांना आवाहन करतो की सगळ्यांनी या लढ्यात समोर यावं. युवकांना आपल्या गल्लीत, मोहल्ल्यात तसेच सोसायटीमध्ये कमिटी तयार करुन कोरोना नियम पाळण्यासंबंधी मोहीम राबवावी. असे केल्यास सरकारला करोना हॉटस्पॉट जाहीर करण्याची गरज पडणार नाही. लॉकडाऊनचा तर प्रश्नच येणार नाही.

  सध्या भीतीचे वातावरण कमी कसे होईल याकडे लक्ष द्यावे. सध्या आपल्याला लॉकडाऊनपासून वाचायचे आहे. मी राज्यांना आवाहन करतो की त्यांनी लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय म्हणून वापरावे. त्या ऐवजी विविध राज्यांनी मायक्रो हॉटस्पॉटवर लक्ष केंद्रीत करावे.

  सर्वांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. सध्या जी परिस्थिती आहे तिला बदलण्यासाठी देश पुरेपूर प्रयत्न करणार आहे.

 • 20 Apr 2021 08:58 PM (IST)

  औषधांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरु- मोदी

  ‘औषधांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरु’

  “देशात औषधांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरु आहे. उत्पादन वाढवण्यासाठी प्रत्येक प्रकारे फॉर्मा कंपनींची मदत घेतली जातेय. आपल्याकडे मजबूत फार्मा सेक्टर आहे. त्याचबरोबर रुग्णालयात बेड्सची संख्या वाढवण्याचं कामही सुरु आहे. काही शहरांमध्ये विशाल कोव्हिड हॉस्पिटल उभारले जात आहेत”, असं मोदी म्हणाले.

Published On - Apr 20,2021 9:12 PM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें