पुण्यातून राज्य चालवा अथवा नवा पालकमंत्री द्या; चंद्रकांत पाटलांनी अजितदादांना पुन्हा डिवचले

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात रंगलेला कलगीतुरा अद्याप थांबताना दिसत नाही. (maharashtra government should appoint new guardian minister for pune, says chandrakant patil)

पुण्यातून राज्य चालवा अथवा नवा पालकमंत्री द्या; चंद्रकांत पाटलांनी अजितदादांना पुन्हा डिवचले
अजित पवार आणि चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Apr 23, 2021 | 2:08 PM

पुणे: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात रंगलेला कलगीतुरा अद्याप थांबताना दिसत नाही. अजितदादांवर कामाचा ताण आहे. त्यामुळे त्यांनी एकतर राज्य पुण्यातून चालवावं किंवा पुण्याला नवा पालकमंत्री द्यावा, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना पुन्हा डिवचले आहे. (maharashtra government should appoint new guardian minister for pune, says chandrakant patil)

पुण्यात मीडियाशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांनी अजितदादांना डिवचले आहे. अजितदादांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह नाही. ते सक्षम आहेत. मी त्यांचं नेहमीच कौतुक केलं आहे. ते सकाळी 7 वाजताच मंत्रालयात जातात. बाकीच्या मंत्र्यांचा दिवस 11 वाजता सुरू होतो. हे मंत्री 11 वाजेपर्यंत फोनही उचलत नाहीत. अजितदादांवर कामाचा लोड आहे. त्यामुळे त्यांनी पुण्यातून राज्य चालवावं किंवा पुण्याला नवा पालकमंत्री द्यावा. त्यांनी पुण्यातून राज्य चालवल्यास ते लोकांना सहज उपलब्ध होतील. लोकांच्या समस्या अधिक वेगाने आणि लवकर सुटतील, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

अडीचशे बेड्सचे कोविड सेंटर लवकरच

पुण्यात आणि राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या काळात भाजप सामाजिक संघटना म्हणून काम करत आहे. अडीचशे बेड्सचे विलगीकरण सेंटर तयार करण्यात आले आहे. ऑक्सिजन बेड्सची कमतरता आहे. कुठल्याही चौकशीशिवाय कोणत्याही निष्कर्षावर जाणं योग्य नाही. चूक तांत्रिक आहे की मानवी आहे हे अहवाल आल्यावर कळेल. पुण्यातील ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितलं. राज्य सरकारने त्यांचं अपयश लपवण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवू नये. सरकार म्हणून तुम्ही काय देत आहात हे सांगा, असं सांगतानाच सीरम इन्स्टिट्यूटने महाराष्ट्राला आधी प्राधान्य द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

अजितदादा बरसले

दोन दिवसांपूर्वी चंद्रकांतदादांनी अजित पवारांना झोप कमी करा आणि पालकमंत्रीपद सोडा असा सल्ला दिला होता. त्यावर आरोप करणाऱ्यांचा हेतू आणि मेंदू तपासा, अशी टीका अजितदादांनी केली होती. भाजप प्रदेशाध्यक्षांनी माझ्यावर नेटवर्कबाहेर असल्याचा आरोप करण्यापूर्वी, त्यांच्या पक्षाचे किती लोकप्रतिनिधी मला भेटले होते. किती मंत्री, अधिकारी, लोकप्रतिनिधींशी मी संपर्क साधून चर्चा केली, याची माहिती घेतली असती, तर असे खोटे आरोप करण्याची त्यांची हिंमत झाली नसती, असा टोला अजित पवारांनी लगावला होता. टेलिव्हिजनच्या पडद्यावर चमकण्यासाठी हपापलेल्या विरोधी पक्षनेत्यांनी बिनबुडाचे आरोप करुन राज्यात गोंधळाची स्थिती निर्माण करु नये. कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्याला कमकुवत करण्याचं पाप करु नये, असा इशारा अजित पवारांनी दिला होता. (maharashtra government should appoint new guardian minister for pune, says chandrakant patil)

संबंधित बातम्या:

चंद्रकातदादा म्हणाले झोप कमी करा, अजित पवार म्हणतात, भाजपचे किती आमदार मला भेटतात हे तपासा

अजित पवारांनी झोप कमी करावी, झेपत नसेल तर पुण्याचं पालकमंत्रीपद सोडा: चंद्रकांत पाटील

Ajit Pawar | विरोधकांनी मेंदू तपासून घेण्याची गरज, अजित पवार आरोपांवर भडकले

(maharashtra government should appoint new guardian minister for pune, says chandrakant patil)

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.