AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्राला 150 रुपयात आणि राज्याला 400 रुपयांना, कोरोना लसीच्या दरात दुजाभाव का? : अशोक चव्हाण

कोरोना लसीतील दुजाभाव संपवून राज्यांनाही केंद्राच्याच दराने लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केलीय.

केंद्राला 150 रुपयात आणि राज्याला 400 रुपयांना, कोरोना लसीच्या दरात दुजाभाव का? : अशोक चव्हाण
काँग्रेस नेते अशोक चव्हाण
| Updated on: Apr 23, 2021 | 8:04 PM
Share

मुंबई : कोरोनाची लस केंद्राला अवघ्या 150 रुपयांत मिळणार आहे. हीच लस राज्यांना 400 रुपयांमध्ये खरेदी करावी लागणार आहे. कोरोना लसीतील हा दुजाभाव संपवून राज्यांनाही केंद्राच्याच दराने लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे (Ashok Chavan demand same price of Corona vaccine for Centre and State Government).

अशोक चव्हाण म्हणाले, “राज्यसभेतील महाराष्ट्राचे खासदार आणि देशाचे माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केंद्र व राज्यांना वेगवेगळ्या दरात लस देण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याचे म्हटले होते. या भूमिकेचं मी समर्थन करतो. 18 ते 45 या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याची जबाबदारी केंद्र सरकारने राज्यांवर टाकली आहे, तर 45 वर्षांवरील नागरिकांसाठी केंद्र सरकार लसपुरवठा करणार आहे. परंतु, एकंदर लोकसंख्येत 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे प्रमाण सुमारे 40 टक्के आहे. 45 वरील नागरिकांचे प्रमाण जेमतेम 20 टक्के आहे.”

केंद्राच्या तुलनेत राज्यांना जवळपास दुप्पट लसीकरण करावे लागणार

“याचाच अर्थ केंद्राच्या तुलनेत राज्यांना जवळपास दुप्पट लसीकरण करावे लागणार आहे. केंद्रापेक्षा राज्यांची लस खरेदी जास्त असणार आहे. अशा परिस्थितीत राज्यांना स्वस्त किंवा किमान केंद्र सरकारच्याच दरात लस मिळणे आवश्यक आहे,” असंही अशोक चव्हाण यांनी नमूद केलं.

महाराष्ट्राला एकूण 11 कोटी लसी खरेदी कराव्या लागतील

अशोक चव्हाण पुढे म्हणाले, “मुळातच केंद्राच्या तुलनेत राज्यांची आर्थिक क्षमता कमी आहे. राज्यांचे आर्थिक स्त्रोतही मर्यादीत आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेता लसीच्या दरांचा केंद्र व लस उत्पादकांनी पूनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. एकट्या महाराष्ट्रात 18 ते 45 वयोगटातील नागरिकांची लोकसंख्या सुमारे 5.50 कोटींच्या घरात आहे. प्रत्येक नागरिकाला 2 लसी द्यायच्या असल्याने महाराष्ट्राला एकूण 11 कोटी लसी खरेदी कराव्या लागतील. एका लसीची किंमत 400 रुपये या दराने महाराष्ट्राला 4 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम त्यासाठी खर्च करावी लागेल.”

आर्थिक कोंडीत फसलेल्या राज्यांना दिलासा द्या

“हा खर्च कमी झाल्यास अगोदरच आर्थिक कोंडीत फसलेल्या राज्यांना दिलासा मिळेल. या शिवाय उर्वरित रक्कम कोरोनाच्या इतर उपाययोजना व सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी देणे शक्य होऊ शकेल. या पार्श्वभूमिवर पी. चिदंबरम यांनी केलेल्या सूचना योग्य आहेत. केंद्र सरकारने त्यांच्याच दरात राज्यांना लस उपलब्ध करून देणे किंवा देशातील सगळ्या राज्यांनी सामूहिकपणे पुन्हा लसीच्या दराबाबत उत्पादकांशी बोलणी करणे संयुक्तिक ठरेल,” असंही अशोक चव्हाण म्हणाले.

हेही वाचा :

रेमडेसिवीरचा काळाबाजार आणि साठेबाजी करणाऱ्यांची NIA आणि ED मार्फत चौकशी करा : अशोक चव्हाण

अशोक चव्हाणांकडून काही दिवसांपूर्वी घोषणा, नांदेडमध्ये ऑक्सिजनचा दुसरा टॅंक दाखल

मागेल त्याला कोरोनाची लस द्या, वयाची अट शिथिल करा; अशोक चव्हाणांची मागणी

व्हिडीओ पाहा :

Ashok Chavan demand same price of Corona vaccine for Centre and State Government

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.