मागेल त्याला कोरोनाची लस द्या, वयाची अट शिथिल करा; अशोक चव्हाणांची मागणी

मागेल त्याला कोरोनाची लस द्या, वयाची अट शिथिल करा; अशोक चव्हाणांची मागणी
अशोक चव्हाण, नेते, काँग्रेस

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यापाठोपाठ राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही 18 वर्षावरील व्यक्तिंना लस देण्याची मागणी केली आहे. (A coronavirus vaccine should be give everyone, says ashok chavan)

भीमराव गवळी

|

Apr 07, 2021 | 3:18 PM

मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यापाठोपाठ राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही 18 वर्षावरील व्यक्तिंना लस देण्याची मागणी केली आहे. 18 वर्षांवरील कोणत्याही व्यक्तिने लस मागितली तर त्याला लस देण्यात यावी, त्यासाठी वयाची अट शिथिल करण्याची मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे. (A coronavirus vaccine should be give everyone, says ashok chavan)

किमान महाराष्ट्रासारख्या कोरोनाबाधीत राज्यांमध्ये तरी केंद्राने नियम शिथिल करून मागेल त्याला ‘कोरोना व्हॅक्सिन’ देण्याची परवानगी द्यावी, असं अशोक चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला लस घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. त्याची ही मागणी योग्य असून केंद्राने प्रारंभी किमान महाराष्ट्रासारख्या कोरोना रूग्णांची संख्या जास्त असलेल्या काही राज्यांमध्ये तरी नियमात शिथिलता आणून लसीकरणाचे प्रमाण वाढवले पाहिजे, असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.

18 वर्षांवरील सर्वांना लस द्या

कोरोनाच्या नव्या लाटेत तरुणांमध्येही संक्रमणाचे प्रमाण वाढताना दिसते आहे. त्यामुळे आता केवळ ज्येष्ठ नागरिक किंवा 45 वर्षांवरील नागरिक अशी मर्यादा न ठेवता 18 वर्षांहून अधिक वयाच्या प्रत्येकासाठी मागेल त्याला लस देण्याचे धोरण स्वीकारण्याची गरज आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने देखील 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक नागरिकाला लस देण्याची परवानगी असावी, अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोरोना लस उत्पादकांशी चर्चा करून त्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ करावी आणि सुरूवातीला महाराष्ट्रासारख्या अतिबाधीत राज्यांमध्ये लसीकरण मोहिमेसाठी अधिकाधिक लसींची उपलब्धता करून द्यावी, असं त्यांनी म्हटलं आहे.

विक्रमी लसीकरण

राज्यात अनेक ठिकाणी दोन किंवा तीन दिवस पुरेल इतक्याच लसींचा साठा शिल्लक असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रात राज्य शासनाच्या माध्यमातून व्यापक स्तरावर लसीकरण मोहिम सुरू आहे. दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्राने एकाच दिवशी 4 लाख 62 हजार नागरिकांना लस देऊन राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली होती. राज्यातील एकूण लसीकरणाची संख्या 1 कोटींच्या घरात पोहोचली आहे. लसीकरण मोहिमेतील महाराष्ट्राची कामगिरी आणि येथील कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता केंद्राने महाराष्ट्रासारख्या राज्यांसाठी वयाची अट शिथिल करून प्रत्येकालाच लस देण्याची परवानगी तसेच पुरेशा लसींचा पुरवठा करावा, असंही त्यांनी म्हटलं आहे. (A coronavirus vaccine should be give everyone, says ashok chavan)

संबंधित बातम्या:

‘कोरोना लसींबाबत केंद्राशी बोला, माध्यमांशी बोलून हात झटकणं बंद करा’, फडणवीसांचा खोचक सल्ला

पुण्यात कोरोनाचा कहर, बेड हवाय तर काय करायचं?; इतर सुविधांसाठी प्रोसेस काय?

बाळा सावंत निष्ठावंत, तृप्ती सावंतांकडून बाळासाहेबांचा अवमान, बंडखोरीचा फटका बसलेले महाडेश्वर कडाडले

(A coronavirus vaccine should be give everyone, says ashok chavan)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें