Health : जिना चढल्यावर धाप लागत असेल तर वेळीच व्हा सावधान, कारण…

दम लागणे हे एक सामान्य लक्षण नसून ते अनेक गंभीर आजारांचं लक्षण आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला दम का लागतो? तर आता आपण याबाबतच जाणून घेणार आहोत.

Health : जिना चढल्यावर धाप लागत असेल तर वेळीच व्हा सावधान, कारण...
| Updated on: Sep 21, 2023 | 10:17 PM

मुंबई : बहुतेक लोकांना चालल्यानंतर किंवा धावल्यानंतर लगेच दम लागतो. तसेच काही असे लोक असतात ज्यांना पायऱ्या चढताना देखील दम लागतो,  त्यांना श्वास घ्यायलाही त्रास होतो. पण अशा गोष्टींकडे लोक जास्त लक्ष देत नाही, त्याकडे दुर्लक्ष करतात. पण तुम्हाला पायर्‍या चढल्यानंतर दम लागत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण हे तुमच्या शरीरासाठी घातक ठरू शकते.

लठ्ठपणा – जे लोक लठ्ठ असतात किंवा ज्यांचं वजन जास्त असतं त्यांना पायऱ्या चढताना दम लागण्याचा त्रास मोठ्या प्रमाणात असतो. लोकांना पायऱ्या चढताना श्वास घेण्यास देखील त्रास होतो. याचं कारण म्हणजे लठ्ठ माणसांचं वजन जास्त असल्यामुळे त्यांच्या फुफ्फुसांवर अतिरिक्त भार पडल्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो. तसेच त्यांच्या मेंदूच्या श्वासोच्छवासावर नियंत्रण बिघडते म्हणूनच त्यांना पायऱ्या चढताना दम लागतो आणि श्वास घेण्यास त्रास होतो.

अस्थमा – आजकाल बहुतेक लोकांना अस्थमाचा त्रास असतो. ज्यांना अस्थमाचा त्रास असतो अशा लोकांना पायऱ्या चढताना दम लागण्याची समस्या दिसून येते. अस्थमा असलेल्या लोकांच्या फुफ्फुसाची स्थिती वाईट असल्याचे दर्शवते, त्यामुळे त्यांना पायऱ्या चढताना श्वास घेण्यास त्रास होण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे अशा लोकांनी डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो उपचार घेणं गरजेचं आहे.

अॅट्रियल फिब्रिलेशन – अॅट्रियल फिब्रिलेशनमध्ये श्वास घेण्यास त्रास निर्माण होतो. तसेच हृदयाचे ठोके देखील मोठ्या प्रमाणात वाढतात. याचं कारण ब्लॉकेजमुळे असू शकते जेव्हा तुम्ही पायऱ्या चढता त्यावेळी तुमचे स्नायू अचानक वेगवान हालचाल करण्यासाठी तयार नसतात, त्यामुळे फुफ्फुस तुमच्या शरीराला जास्त हवा पुरवण्यासाठी काम करते त्यामुळे तुम्हाला दम लागण्याचा त्रास निर्माण होतो. त्यामुळे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांकडून उपचार घ्या.