AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health | हृदयाच्या आरोग्यासाठी दिवसाला किती पाणी प्यायला पाहिजे, जाणून घ्या

बहुतेक लोक पाणी कमी पितात, कमी पाणी  पिल्यामुळे आपल्या हृदयाला हानी पोहोचू शकते. त्यामुळे कोलेस्ट्रॉलचा धोका देखील वाढतो. पाणी कमी पिल्यामुळे उच्च रक्तदाब होतो ज्यामुळे हृदयविकार झपाट्याने वाढतो. त्यामुळे आता आपण पाणी कमी पिल्याचे दुष्परिणाम काय होतात याबाबत जाणून घेणार आहोत.

Health | हृदयाच्या आरोग्यासाठी दिवसाला किती पाणी प्यायला पाहिजे, जाणून घ्या
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Sep 21, 2023 | 7:23 PM
Share

 मुंबई : पौष्टिक आहार आणि भरपूर पाणी पिल्यामुळे आपले शरीर नेहमी निरोगी राहते. कारण आपण काय खात आहोत आणि काय पित आहोत याच्यावर आपले शरीर निगडीत असते. त्यात तुम्हाला तुमच्या हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर पौष्टिक आहार घेणं खूप गरजेचे आहे. पण सध्याच्या जीवनात आपल्या आहारात आणि जीवनशैलीमध्ये अनेक बदल होत गेले आहेत. त्यामुळे बाहेरचे फास्ट फूड खाणे, कमी पाणी पिणे अशा अनेक गोष्टी आपण करत असतो. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो, हृदयावरती होतो.

डॉक्टर नेहमी प्रत्येकाला पाणी जास्त पिण्याचा सल्ला देतात. कारण पाणी जर कमी पिले तर आपल्या हृदयावर त्याचा परिणाम होऊ शकतो. पाणी कमी पिल्यामुळे कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर परिणाम होतो. आपण पाणी कमी पिले तर डीहायड्रेशन होते आणि डीहायड्रेशनमुळे यकृत रक्तात मोठ्या प्रमाणात कोलेस्ट्रॉल सोडते, त्यामुळे हृदयविकाराचा धोका आपल्याला निर्माण होतो. त्यामुळे पाणी हे जास्त पिले पाहिजे जेणेकरून हृदयविकाराचा धोका निर्माण होणार नाही.

तसंच जर तुम्हाला हृदयाशी संबंधित काही आजार असतील तर तुम्ही हृदय निरोगी ठेवणे गरजेचे आहे. तुम्हाला तुमचे हृदय निरोगी ठेवायचे असेल तर तुम्हाला दररोज दिवसातून दीड ते दोन लिटर पाणी प्यावे लागेल. पाण्यासोबतच तुम्ही नारळ पाणी, ज्यूस, सरबत असे द्रव पदार्थ पिऊन तुमच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढू शकतात.

हृदय निरोगी ठेवण्यासाठी पाणी पिणे खूप गरजेचे आहे. कारण पाणी हे आपले रक्त परिसंचारण सुधारण्यास मदत करते आणि हृदयाच्या कार्याला चालना देखील देते. पाणी हे हृदयाच्या सर्व कक्षांना निरोगी ठेवण्यास मदत करते, त्यामुळे हृदय निरोगी ठेवायचे असेल तर पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हीही दररोज जास्तीत जास्त पाणी द्या आणि निरोगी रहा.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...