AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 तोंडावर असताना मोहम्मद शमी कोर्टात हजर, पत्नी हसीन जहां म्हणतेय कसा माज मोडला!

Mohammed shami Hasin Jahan : भारतीय संघाचा स्टार खेळाडू मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहांने त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. या प्रकरणासंदर्भात शमीली कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर हसीन जहांने एक पोस्ट करत शमीचा माज मोडल्याचं म्हटलं आहे.

World Cup 2023 तोंडावर असताना मोहम्मद शमी कोर्टात हजर, पत्नी हसीन जहां म्हणतेय कसा माज मोडला!
| Updated on: Sep 21, 2023 | 5:17 PM
Share

मुंबई : वन डे वर्ल्ड कप 2023 सुरू व्हायला अवघे काही दिवस बाकी असताना भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी कोर्टात हजर झाला होता. मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहाने त्याच्यासह परिवारावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. हे प्रकरण अद्याप कोर्टात असून मोहम्मद शमीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मोहम्मद शमी भारतीय संघाच्या मुख्य गोलंदाजांपैकी एक असून आगामी वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर कोर्टात गेल्याने चाहेत चिंतेत पडले.

कोर्टात नेमकं काय झालं?

मोहम्मद शमीला बुधवारी कोर्टात हजर राहण्याचे आदेश होते. त्याप्रमाणे शमी कोलकाताच्या अलीपूर कोर्टात हजर राहत त्याने 2000 रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन घेतला. यावेळी मोहम्मद शमीसोबत त्याचा हसीब अहमदही कोर्टामध्ये त्याच्यासोबत उपस्थित होता. शमीला जामीन मिळाल्यावर त्याच्या पत्नीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली असून ती मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

हसीन जहांने शमीला टॅग करत पोस्टमध्ये, भारतामध्ये कायद्यापेक्षा काहीच मोठं नाही. एवढ्या मोठ्या क्रिकेटपटूला जामीन घेण्यासाठी न्यायलयात हजर रहावं लागलं यावरून भारतातील कायदा कोणासमोरच झुकत नाही हे सिद्ध झाल्याचं हसरत जहांने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.  इतका मोठा खेळाडू असून त्याचा काही उपयोग झाला नाही. कारण जामीनासाठी त्याला न्यायालयातच जावं लागलं. काही विकल्या गेलेल्या माध्यमांनी त्याला दिलासा म्हटलं असलं तरी माझ्या नजरेत त्याचा माज मोडला असल्याचंही हसरत जहां म्हणालीय.

दरम्यान,  2018 साली मोहम्मद शमी याची पत्नी हसरत जहांने त्याच्यासह परिवारावर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर शमीविरोधात कारवाई करण्यात आली होती. अजूनही हे प्रकण कोर्टात असून शमीला बुधवारी जामीन मिळाला आहे. वर्ल्ड कपआधी मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेमध्ये खेळताना दिसेल. आता पार पडलेल्या आशिया कपवर भारताने नाव कोरलं असून भारतीय संघाचा मोहम्मद शमी महत्त्वाचा खेळाडू होता.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.