
नवी दिल्ली : रणरणता उन्हाळा (hot summer) आला, लोकांच्या अंगाची काहिली होत्ये. आपल्यापैकी अनेकांना हा उन्हाळा आवडत नाही. पण काही लोकांना तो आवडतो, पण उन्हामुळे नव्हे काही तर त्या ऋतूत मिळणारे पदार्थ आणि फळांमुळे. अनेक जण तर उन्हाळ्याची वाट बघत असतात, पण ती फक्त आंब्यांसाठीच… आंबा (mangoes) न आवडणारी व्यक्ती विरळच ! मात्र हा आंबा खाण्याचीही काही पद्धत असते. आंबे खाण्यापूर्वी पाण्यात भिजवण्याची प्रथा वर्षानुवर्षे सुरू आहे. बहुतेक लोकांना आंबे खाण्यापूर्वी काही वेळ पाण्यात भिजवायला आवडतात. कारण ते आरोग्याला अनेक फायदे देतात असे मानतात. पण ते खरे आहे का? आंबे खरोखरच पाण्यात (mango soaked in water) भिजवून खावेत की नाही? चला जाणू घेऊया.
खरंतर, आंबे पाण्यात न भिजवता खाल्ल्याने आरोग्याचे अनेक नुकसान होऊ शकतात. आंबा खाण्यापूर्वी पाण्यात भिजवून ठेवल्याने त्यातील दूषित घटक बाहेर पडतात, त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्ससह अनेक शारीरिक समस्या उद्भवतात. जर तुम्ही पाण्यात न भिजवता आंबा खाल्ला तर तुमच्या पोटातील उष्णता वाढू शकते, ज्यामुळे बद्धकोष्ठता, ॲसिड रिफ्लेक्स आणि इतर गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या उद्भवू शकतात. आंबे खाण्यापूर्वी ते पाण्यात का भिजवायचे ते जाणून घेऊया.
1) फायटिक ॲसिड होते रिलीज
आंब्यामध्ये फायटिक ॲसिड नावाचा नैसर्गिक पदार्थ असतो, जो पोषण विरोधी मानला जातो. फायटिक ॲसिड लोह, जस्त आणि कॅल्शियम सारख्या खनिजांचे शोषण रोखते, ज्यामुळे शरीरात या खनिजांची कमतरता होऊ शकते. याच कारणामुळे आंबे खाण्यापूर्वी काही वेळ पाण्यात भिजवावेत. हे आंब्यातील फायटिक ॲसिड काढून टाकण्यास मदत करते.
2) कीटकनाशके बाहेर पडण्यास होते मदत
अनेक वेळा आंब्यावर बऱ्याच प्रकारची कीटकनाशके वापरली जातात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही जर न धुता आंब्याचो सेवन केले तर तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. याशिवाय डोकेदुखी, बद्धकोष्ठता आणि इतर समस्याही उद्भवू शकतात. त्वचा, डोळे आणि श्वसनमार्गामध्ये जळजळ होऊ शकते. तसेच ॲलर्जी होऊ शकते. या समस्या टाळण्यासाठी आंबे नेहमी थोडा वेळ पाण्यात भिजवून मगच खावेत.
3) कमी होते आंब्यातील उष्णता
आंबे पाण्यात भिजवून ठेवल्याने उष्णता कमी होते. ते न भिजवता खाल्ल्यास चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात. याशिवाय मळमळ आणि उलटीची समस्याही उद्भवू शकते. यामुळेच आंबा खाण्यापूर्वी किमान अर्धा तास तरी पाण्यात भिजवून ठेवा. पाण्यात भिजवल्याने आंब्यातील सर्व हानिकारक घटक निघून जातात.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)