उपाशी पोटी लसूण खाण्याचे अत्यंत गुणकारी फायदे, ‘या’ आजारांवर रामबाण उपाय!

| Updated on: May 28, 2023 | 11:55 PM

शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि अनेक रोग होण्याचा धोका टळतो. तसंच तुम्हाला माहितीये का की सकाळी उपाशी पोटी लसूण खाल्ल्याने त्याचे शरीराला अनेक फायदे होतात. तर याबाबत जाणून घ्या.

उपाशी पोटी लसूण खाण्याचे अत्यंत गुणकारी फायदे, या आजारांवर रामबाण उपाय!
Follow us on

Health News : लसूण हा असा मसाल्याचा पदार्थ आहे जो प्रत्येकाच्या घरी दररोज वापरला जातो. तसंच लसूण हा भाजीत किंवा एखाद्या पदार्थात मिक्स केल्यावर त्या पदार्थाला आणखी भारी चव येते. लसूण फक्त पदार्थांमध्ये टेस्ट आणण्याचंच काम करत नाही तर सोबतच लसूणमध्ये अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात. त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि अनेक रोग होण्याचा धोका टळतो. तसंच तुम्हाला माहितीये का की सकाळी उपाशी पोटी लसूण खाल्ल्याने त्याचे शरीराला अनेक फायदे होतात. तर आपण आज याबाबत जाणून घ्या.

उपाशी पोटी लसूण खाण्याचे फायदे

कॅन्सरपासून संरक्षण

लसूणमध्ये एंटी ऑक्सिडेंट, एंटी इंफ्लेमेटरी आणि एंटी कार्सिनोजेनिक हे घटक आढळतात. त्यामुळे दररोज सकाळी उपाशी पोटी लसूण खाल्ला पाहिजे. यामुळे कॅन्सरचा धोका टळतो.

डायबिटीससाठी मदत होते

लसूणमध्ये एलिसिन नावाचे एक घटक असते जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. त्यामुळे डायबिटीस असलेल्या लोकांनी उपाशी पोटी दररोज 4 लसूणच्या पाकळ्या खाव्या त्यांना यामुळे खूप मदत होईल.

वजन नियंत्रणात राहण्यास मदत

तुम्हाला जर तुमचे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुम्ही दररोज लसूणच्या काही पाकळ्या खाल्ल्या पाहिजेत. कारण लसणात काही असे घटक असतात जे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करते. त्यामुळे दररोज लसूणच्या पाकळ्या खाव्यात.

डिप्रेशन होईल दूर

लसूण मेंटल हेल्थसाठी देखील उपयुक्त आहे. लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने आपलं मन संतुलित राहते सोबतच आपल्याला नैराश्याशी लढण्याची ताकद मिळते. तसंच डिप्रेशनमधून सुटका करण्यासाठी अनेकदा लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो.

Disclaimer : वरील दिलेली सर्व माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित असून टीव्ही9 मराठी याची पुष्टी करत नाही. कोणताही घरगुती उपाय करताना तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.