World Diabetes Day 2026: डायबिटीजमध्ये कोणत्या अवयवांना धोका, काय असतात लक्षणे ?
दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी जागतिक डायबिटीज दिवस साजरा केला जातो. याचा उद्देश्य लोकांना डायबिटीज संदर्भात जागरुक करणे हा असतो. डायबिटीज आता केवळ वयस्कांचा आजार राहिला नाही तर कमी वयाच्या लोकांना देखील हा आजार होऊ शकतो.

दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी जगभरात डायबिटीज दिवस (World Diabetes Day) साजरा केला जातो. याचा हेतू लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे आणि या आजारापासून बचावासंदर्भात माहिती देणे हा आहे. डायबिटीज आता केवळ म्हाताऱ्या लोकांचा आजार राहिलेला नाही. कमी वयाचे लोक देखील या आजाराच्या फेऱ्यात येत आहेत. या आजाराची सर्वात चिंतादायक बाब म्हणजे या आजाराच्या लक्षणांचा पत्ता लागत नाही. जेव्हा हा आजार खूप वाढतो आणि अन्य अवयवांवर याचा परिणाम सुरु होतो तेव्हा रुग्ण डॉक्टरांकडे येतात. यात चाचणीनंतर कळते की डायबिटीजचा अन्य अवयवांवर परिणाम सुरु झाला आहे.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या मतानुसार डायबिटीजचा धोका सतत वाढत आहे. आधी ५० नंतर या आजाराचे सर्वाधिक प्रकरणे समोर यायची.परंतू आता ३० नंतर देखील लोक या आजाराचे बळी पडत आहेत. शहरी लोकांची खराब लाईफस्टाईल, उशीरा झोपणे, फिजिकट एक्टीव्हीटीची कमतरता आणि वाढता लठ्ठपणा या आजाराच्या धोक्यांना वाढवत आहे.
शुगर वाढल्याने कोणत्या अवयवांवर परिणाम होतो ?
दीर्घकाळापर्यंत ब्लड शुगर वाढल्याने शरीरातील अनेक अवयवयांवर परिणाम होत आहे. याचा परिणाम किडनीवर जास्त होतो. किडनीच्या छोट्या -छोट्या नसांना नुकसान पोहचू शकते. याला डायबिटीक नेफ्रोपॅथी म्हणतात. वेळीच उपचार केला नाही तर किडनीची काम करण्याची क्षमता घटू शकते आणि गंभीर प्रकरणात किडनी फेल होण्याचा धोका असतो.
डायबिटीजचा डोळ्यांवर देखील परिणाम होतो. यामुळे डोळ्याचा पडदा म्हणजे रेटीनाची नसे खराब होऊ शकतात. या आजाराला डायबिटीक रेटिनोपॅथी म्हणतात. वेळीच तपासणी आणि उपचार न झाल्यास डोळ्यांना अंधत्व येऊ शकते.
डायबिटीजने हार्टचा आजार आणि स्ट्रोकचा खतरा
डायबिटीजने हार्टचा आजार आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. दीर्घकाळ शुगरचा आजार राहिल्याने नसांचे नुकसान होतो. यास डायबिटीज न्यूरोपॅथी म्हणतात. यामुळे हाता-पायांना मुंग्या येणे आणि जळजळ आणि सुन्नपणा येऊ शकतो.
डायबिटीजची लक्षणे काय?
डायबिटीजमध्ये वारंवार लघवीला येते, खूप जास्त तहान लागते, भूक वाढते, थकवा येणे आणि धुरकट दिसणे हे डायबिटीजचे सर्वसाधारण लक्षणे आहेत. काही लोकांमध्ये जखम भरण्यास वेळ लागतो आणि वारंवार संक्रमण देखील होऊ शकते. अनेक रुग्णात सुरुवातीला कोणतीच लक्षणे दिसत नाही. त्यामुळे वेळावेळी ब्लड शुगर आणि HbA1c ची तपासणी करणे गरजेचे आहे.