AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

730 किमी रेंज, 9 मिनिटांमध्ये फुल होते चार्जिंग, BYD च्या लक्झरी ब्रँडची भारतात एन्ट्री, किंमत किती?

BYD च्या लक्झरी ब्रँडची भारतात एन्ट्री. Denza D9 लॉन्च. एका फुल चार्ज केल्यावर 730 किमी धावणार. फीचर्स देखील आहेत प्रचंड जबरदस्त. किंमत किती?

730 किमी रेंज, 9 मिनिटांमध्ये फुल होते चार्जिंग, BYD च्या लक्झरी ब्रँडची भारतात एन्ट्री, किंमत किती?
| Updated on: Nov 13, 2026 | 4:51 PM
Share

चीनची आघाडीची इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी BYD ने भारतीय बाजारपेठेत आपल्या नवीन लक्झरी ब्रँड Denza ची एन्ट्री केली आहे. कंपनीने Denza D9 ही प्रीमियम इलेक्ट्रिक MPV तब्बल 90 लाख रुपये (एक्स-शोरूम) किमतीत लाँच केली आहे. या गाडीच्या माध्यमातून कंपनीने लक्झरी MPV सेगमेंटमध्ये पाऊल ठेवले आहे. भारतीय बाजारात या गाडीची स्पर्धा Toyota Vellfire, Lexus LM आणि Mercedes-Benz V-Class यांसारख्या प्रीमियम गाड्यांशी होणार आहे.

Denza D9 ला आकर्षक आणि प्रीमियम लूक देण्यात आला आहे. पुढील बाजूला उभी क्रोम स्ट्रिप असलेली ब्लँक्ड-ऑफ ग्रिल, U-शेप LED DRL आणि आधुनिक हेडलाइट्स देण्यात आले आहेत. याशिवाय बंपरवर C-शेप सिल्व्हर एलिमेंट्स आणि LED लाइटिंग स्ट्रिप्स आहेत. गाडीच्या साइड प्रोफाइलमध्ये 18-इंच अलॉय व्हील्स, सरळ बेल्टलाइन आणि रूफलाइन पाहायला मिळते. दुसऱ्या आणि तिसऱ्या रांगेतील प्रवाशांसाठी पॉवर्ड स्लायडिंग डोअर्स देण्यात आले आहेत. मागील बाजूला फुल-विड्थ LED टेललाइट बार आणि मेमरी फंक्शनसह पॉवर्ड टेलगेट मिळते. ही गाडी Whale Sea Blue, Cosmos Black, Starry Night Grey आणि Arctic White अशा चार रंगांमध्ये उपलब्ध आहे.

केबिनमध्ये मिळणार लक्झरीचा अनुभव

Denza D9 ही सात आसनी MPV असून तिच्यामध्ये 2+2+3 सीटिंग लेआउट देण्यात आला आहे. केबिनसाठी Black and Brown, Black and Beige आणि All-Black असे तीन पर्याय आहेत. पुढील सीट्सना 8-वे पॉवर अॅडजस्टमेंट, मसाज आणि लंबर सपोर्ट मिळतो. ड्रायव्हर सीटला व्हेंटिलेशन, तर को-ड्रायव्हर सीटला बॉस मोड देण्यात आला आहे. दुसऱ्या रांगेतील सीट्समध्ये पॉवर अॅडजस्टमेंट, मसाज, व्हेंटिलेशन, ऑटोमन आणि मेमरी फंक्शन मिळते. तिसऱ्या रांगेतील सीट्सही इलेक्ट्रिकली अॅडजस्ट करता येतात.

बॅटरी आणि रेंज किती?

Denza D9 मध्ये 115.07kWh क्षमतेचा BYD Blade बॅटरी पॅक देण्यात आला आहे. ही गाडी फ्रंट व्हील ड्राइव्ह (FWD) सेटअपसह येते. तिची इलेक्ट्रिक मोटर 462hp पॉवर आणि 365Nm टॉर्क निर्माण करते. कंपनीच्या दाव्यानुसार, ही MPV NEDC प्रमाणपत्रानुसार एका चार्जमध्ये 730 किलोमीटरपर्यंत रेंज देते.

चार्जिंगसाठी यात DC फास्ट चार्जिंग आणि 11kW AC चार्जिंगचा पर्याय आहे. DC फास्ट चार्जिंगद्वारे बॅटरी 10 ते 97 टक्क्यांपर्यंत चार्ज होण्यासाठी अवघ्या नऊ मिनिटांचा वेळ लागतो, असा कंपनीचा दावा आहे. या कारची किंमत 90 लाख रुपये आहे.

Follow Us
गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
Ram Kadam On Thackeray Brothers : गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचा फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता
Price Rate Hike : भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचाही फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं
विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती....
Aditi Tatkare On NCP Merger : विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती तटकरेंचा थेट सवाल
नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं...
Nagpur Students Meet Amit Thackeray : नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं प्रकरण काय?
मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं....
Dharashiv : मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं; तुळजापूर तालुक्यात खळबळ
माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप....
Rahul Gandhi : माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप; पृथ्वीराज चव्हाणांचंही मोठं विधान, म्हणाले....
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
NCP Merger : Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना...
NCP : सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना दत्तात्रय भरणेंनी दिला पूर्णविराम
छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? ठाकरेंचा आरोप
Raj Thackeray On Chhath Pooja : छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? राज ठाकरेंचा मोठा आरोप
भाजपला लवकरच सत्तेतून पायउतार व्हावं लागणार; राज ठाकरेंचा मोठा दावा...
Raj Thackeray On BJP : भाजपला लवकरच सत्तेतून पायउतार व्हावं लागणार; राज ठाकरेंचा मोठा दावा, Gen-Z आंदोलनाचा उल्लेख करत सत्तांतराचे संकेत?