AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार भाजपसोबत गेले तर आमचा पक्ष…, पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केली भीती, सांगितली आतली गोष्ट

गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देताना आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा दावा केला आहे. चव्हाण यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

शरद पवार भाजपसोबत गेले तर आमचा पक्ष..., पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केली भीती, सांगितली आतली गोष्ट
पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा दावा Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 13, 2026 | 4:40 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे रुग्णालयात असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती, तेव्हापासून पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली. दरम्यान त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील मोठा गौप्यस्फोट केला होता. अजित पवार असते तर 12 फेब्रुवारी रोजीच विलिनीकरण झालं असतं, असा दावा त्यांनी केला होता.

दरम्यान सुनील तटकरे यांच्या या दाव्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील मोठा दावा केला होता, राष्ट्रवादीचे वीस ते बावीस आमदार फुटणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मात्र राऊत यांचा हा दावा फेटाळून लावण्यात आला, तसेच राऊत यांच्यावर चांगलाच हल्लाबोल देखील करण्यात आला. दरम्यान या सर्व घडामोडी सुरू असतानाच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मोठं विधान केलं आहे. तसेच शरद पवार यांच्याबद्दल देखील मोठा दावा केला आहे.

नेमकं काय म्हणाले चव्हाण?

जर शरद पवार 60 वर्षांनंतर भाजपसोबत गेले तर तो त्यांचा वयक्तिक स्वार्थ असेल, परंतु असं होणार नाही. मला नाही वाटत ते असं करतील म्हणून.  मात्र शेवटी त्यांचा पक्ष आहे, निर्णयही त्यांचा असेल. मात्र दोन्ही पक्ष एकत्र येऊन जर ते तिकडे गेले तर मात्र आमची ताकद थोडी कमी होईल, असं यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. तसेच जर तसं झालं तर मग देशात दोनच विचारधारा राहातील असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान त्यावेळी सोनिया गांधींनी अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. परंतु वर्किंग कमिटीच्या आग्रहाखातर त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला. राजीव गांधींच्या निधनानंतर परत इटलीला या असा त्यांच्यावर दबाव होता, मात्र त्यांनी भारतीय मायभूमीचा स्वीकार केला, असंही यावेळी चव्हाण यांनी म्हटलं आहे.

Follow Us
गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
Ram Kadam On Thackeray Brothers : गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचा फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता
Price Rate Hike : भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचाही फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं
विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती....
Aditi Tatkare On NCP Merger : विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती तटकरेंचा थेट सवाल
नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं...
Nagpur Students Meet Amit Thackeray : नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं प्रकरण काय?
मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं....
Dharashiv : मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं; तुळजापूर तालुक्यात खळबळ
माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप....
Rahul Gandhi : माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप; पृथ्वीराज चव्हाणांचंही मोठं विधान, म्हणाले....
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
NCP Merger : Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना...
NCP : सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना दत्तात्रय भरणेंनी दिला पूर्णविराम
छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? ठाकरेंचा आरोप
Raj Thackeray On Chhath Pooja : छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? राज ठाकरेंचा मोठा आरोप
भाजपला लवकरच सत्तेतून पायउतार व्हावं लागणार; राज ठाकरेंचा मोठा दावा...
Raj Thackeray On BJP : भाजपला लवकरच सत्तेतून पायउतार व्हावं लागणार; राज ठाकरेंचा मोठा दावा, Gen-Z आंदोलनाचा उल्लेख करत सत्तांतराचे संकेत?