दुसऱ्या महायुद्धाच्या वैमानिकानं उलगडलं दीर्घायुष्याचं रहस्य! फक्त तीन गोष्टींनी मिळवलं वय वर्षे 102; कसं ते जाणून घेऊ या…

| Updated on: Jul 30, 2022 | 6:57 PM

काही काळापूर्वी दुसऱ्या महायुद्धातील वैमानिकाचा 102वा वाढदिवस साजरा झाला. हॅरी गॅम्पर असे या व्यक्तीचे नाव असून ते स्कॉटलंडमध्ये राहतात. हॅरी गॅम्पर यांनी त्याच्या दीर्घायुष्याचे रहस्य उलगडले आणि कोणत्या तीन गोष्टी खाल्ल्याने त्यांना इतके दीर्घायुष्य मिळाले याबाबत सांगितले.

दुसऱ्या महायुद्धाच्या वैमानिकानं उलगडलं दीर्घायुष्याचं रहस्य! फक्त तीन गोष्टींनी मिळवलं वय वर्षे 102; कसं ते जाणून घेऊ या...
102 वर्षीय हॅरी गॅम्पर
Image Credit source: Facebook
Follow us on

मुंबई : प्रत्येकाला दीर्घायुषी व्हायचे आहे. पण आजकाल आळशी जीवनशैली (A lazy lifestyle), खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, आजारांचा धोका (Risk of diseases) यामुळे तरूण वयातच लोक मृत्यूला गाठतात. विज्ञान सांगते, की जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या माणसाला दीर्घायुष्य प्रदान करू शकतात. उदाहरणार्थ, बदाम, बेरी किंवा मासे खाल्ल्याने शरीराला मिळणारे पोषण हृदयाचे आरोग्य सुधारते आणि प्रतिकारशक्ती देखील मजबूत होते. अशा इतर अनेक गोष्टी आहेत ज्या माणसाचे आयुष्य वाढवू शकतात. अलीकडेच एका व्यक्तीने त्याचा 102वा वाढदिवस साजरा केला आणि तो अजूनही पूर्णपणे निरोगी आहे. या 102 वर्षीय व्यक्तीने आपल्या दीर्घ आयुष्याचे रहस्य (The secret to a long life) सांगितले आहे. यासोबत हे देखील सांगण्यात आले आहे, की कोणत्या तीन गोष्टी खाल्ल्याने ते निरोगी राहतात.

कोण आहेत हे 102 वर्षांचे आजोबा?

द मिररच्या वृत्तानुसार, या 102 वर्षीय दिग्गजाचे नाव हॅरी गॅम्पर (Harry Gamper) आहे. जे द्वितीय विश्वयुद्धातील निवृत्त वैमानिक आहेत. युद्धादरम्यान ते आरएएफ पायलट होते आणि डी-डे लँडिंगमध्ये हजर होते. त्यांचा जन्म 1920मध्ये झाला. कोरोनाच्या काळात, 2020मध्ये, ते आपला 100वा वाढदिवस साजरा करू शकले नाही. तो खास वाढदिवसही त्यांना साजरा करायचा होता. फ्रान्स आणि जर्मनीमध्ये त्यांच्या सेवेबद्दल त्यांना पदकेही मिळाली आहेत. त्यांनी अटलांटिकच्या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावली आणि RAFमध्ये पायलट म्हणून 1,000 तास उड्डाण केले.

हे आहे दीर्घायुष्याचे रहस्य

हॅरी गॅम्परच्या दीर्घायुष्याचे रहस्य म्हणजे उत्तम वाइन, चांगले अन्न आणि संगीत. 2022मध्ये आपला 102वा वाढदिवस साजरा करणाऱ्या हॅरी गॅम्परने मुलाखतीदरम्यान सांगितले, की माझे आयुष्य खूप सुंदर आहे आणि मी नेहमीच माझे आयुष्य खूप चांगले जगलो आहे. मला कला, संगीत, चांगले अन्न आणि उत्तम वाइन आवडते. या सर्व गोष्टी आणि बरेच काही. माझ्या आजूबाजूचे लोक जीवनात सर्वात महत्त्वाचे आहेत. हेच माझ्या दीर्घायुष्याचे रहस्य आहे.

हे सुद्धा वाचा

शास्त्रज्ञांनी दीर्घायुष्याचे रहस्यही शोधून काढले

यूके-आधारित सीबीडी कंपनी ईडन गेटने जगातील सर्वात वृद्ध लोकांचा त्यांच्या दीर्घ आयुष्याचे रहस्य शोधण्यासाठी अभ्यास केला. 100 वर्षांहून अधिक जगलेल्या सहा लोकांवर संशोधकांनी संशोधन केले. त्यांनी निरोगी आणि दीर्घायुष्यामागील चार मुख्य घटकांकडे पाहिले – हालचाल, सामाजिक-आर्थिक स्थिती, तणाव, (स्ट्रेस लेवल आणि डाएट). या अभ्यासात 122 वर्षीय जीन-लुईस कॅलमेंट यांच्या आहारावरही विचार करण्यात आला, जो जगातील सर्वात जास्त काळ जगणारा व्यक्ती आहे. 1977 मध्ये त्यांचे निधन झाले. शास्त्रज्ञांनी सांगितले होते की कोणत्या तीन गोष्टी खाल्ल्याने दीर्घायुष्य मिळू शकते.

ऑलिव्ह ऑइल (Olive oil)

संशोधकांनी ‘जीन-लुईस कॅलमेंट’च्या आहारातील तीन विशेष गोष्टी पाहिल्या. त्याच्या आहाराचे पहिले रहस्य ‘ऑलिव्ह ऑइल’ होते. हेल्थलाइनच्या अहवालानुसार ऑलिव्ह ऑइलमध्ये हेल्दी फॅट, अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. त्यामुळे हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोकाही कमी होतो.

रेड वाइन (RED-WINE)

कॅलमेंटच्या आहाराचे दुसरे रहस्य म्हणजे रेड वाइन. मेयो क्लिनिकच्या अहवालानुसार, रेड वाइनमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात. तथापि, तज्ज्ञ नियमितपणे रेड वाइन पिण्याचा सल्ला देतात.

चॉकलेट (Chocolates)

संशोधना नुसार, चॉकलेट खाणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. Kalment Diet आणि Hopkins Medicine नुसार चॉकलेट खाल्ल्याने वय वाढते. चॉकलेट रक्ताभिसरणाला मदत करते आणि मेंदूच्या कार्याला चालना देऊन स्नायूंच्या क्षमतांमध्ये चमत्कारिक सुधारणा घडविण्यास मदत करते.