AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आहारात कमी कॅलरीज्‌ घ्या अन्‌ दीर्घायुषी व्हा… काय सांगतो अभ्यास

आहार व दीर्घायुष्याबद्दल नुकताच एक अभ्यास समोर आला आहे. आहारातील कॅलरीजचे प्रमाण कमी केल्यास व्यक्ती जास्त काळ जगू शकतो, असा दावा या अभ्यासात केला आहे. कॅलरीजचे सेवन कमी केल्याने, थायमस ग्रंथी चांगले कार्य करतात. ज्यामुळे जास्त काळ जगण्याची शक्यता वाढते.

आहारात कमी कॅलरीज्‌ घ्या अन्‌ दीर्घायुषी व्हा... काय सांगतो अभ्यास
ओट्समध्ये प्रथिने आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. फायबर पचायला वेळ लागतो. त्यामुळे पोट बराच काळ भरलेले राहते.
| Edited By: | Updated on: Feb 28, 2022 | 1:35 PM
Share

आपण रोजच्या जीवनात कुठला आहार घेतो, याला अत्यंत महत्व असते. आपला आहारविहारच आपल्या निरोगी जीवनशैलीचे प्रतीक असते. त्यामुळे आपल्या आहाराला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. असे म्हटले जाते की, पूर्वी अन्नात भेसळ नसल्याने लोकांचे आयुर्मानदेखील (Longevity) वाढते होते. पूर्वी सहज पध्दतीने लोक वयाची शंभरी पार करीत होते. त्यांच्या खानपान पध्दतीदेखील चांगल्या होत्या. शरीराला आवश्‍यक तेव्हढाच व सकस आहाराचा समावेश ते करत असत. आता मात्र तसे राहिले नाही. वाढते प्रदूषण, अन्नातील भेसळ, बदलती जीवनशैली, (Lifestyle) चुकीच्या खानपान पध्दती आदींमुळे मानसाचे आयुर्मान कमी झाले आहे. त्यामुळे आपण काय खातो आणि किती खातो हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार जे लोक कमी अन्न खातात ते जास्त काळ जगतात असा दावा केला गेला आहे. येल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की कॅलरीजचे सेवन कमी केल्याने (Low calorie food) तुमची रोगप्रतिकारक शक्ती पुन्हा जिवंत होऊ शकते.

अभ्यासात असे आढळून आले, की जे तरुण 14 टक्के कमी कॅलरी ग्रहन करतात, त्यांची थायमस ग्रंथी अधिक चांगले काम करत होती. थायमस ग्रंथी हृदयाच्या वर असते आणि रोगाशी लढणाऱ्या टी-पेशी निर्माण करते. या ग्रंथीतून ‘थायमोसिन’ नावाचा हार्मोन स्त्रवतो. थायमस ग्रंथी गायब झाल्यामुळेच मानवामध्ये वृद्धत्व येते. मुलांमध्ये ही ग्रंथी मोठी असते. या संशोधनात सहभागी असलेले आहारतज्ञ विश्वदीप दीक्षित म्हणाले, की दीर्घायुष्यासाठी ही ग्रंथी नष्ट होण्यापासून बचाव केला पाहिजे. संशोधकांचे मत आहे की, कॅलरीज्‌चे प्रमाण कमी केल्याने शरीरातील जळजळही कमी होऊ शकते.

काय सांगतो अभ्यास?

‘सायन्स’मध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात 26 ते 47 वयोगटातील 238 दुबळ्या लोकांचा समावेश होता आणि यापैकी दोन तृतीयांश लोकांना त्यांच्या कॅलरीजचे सेवन कमी करण्यास सांगितले होते. या अभ्यासात सामील असलेल्या लोकांचे दैनंदिन शरीराचे वजनदेखील मोजले गेले. जेव्हा संशोधकांनी दोन वर्षांनंतर या सर्व लोकांचे एमआरआय स्कॅन केले तेव्हा ज्यांनी आपल्या आहारात कमी कॅलरीज घेतल्या आहेत, त्यांच्यामध्ये थायमस ग्रंथी अधिक चांगले काम करत असल्याचे आढळून आले.

संशोधकांनी थायमस ग्रंथीभोवती असलेल्या टी-पेशींची संख्या तसेच चरबीची पातळीदेखील तपासली. संशोधकांना असेही आढळले, की जे लोक आहारात कमी कॅलरी घेतात, त्यांच्या थायमस ग्रंथीभोवती चरबीची उपस्थिती सामान्य आहार घेणाऱ्यांच्या तुलनेत कमी असल्याचे आढळून आले. ज्येष्ठ लेखक व येल सेंटर फॉर रिसर्च ऑन एजिंगचे संचालक प्रा. दीक्षित म्हणाले की, दोन वर्षांपासून कमी कॅलरी घेणार्‍या लोकांमध्ये टी-सेलची निर्मिती अधिक होत असते. त्यामुळे मानवी आयुर्मान वाढत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Low calorie food can increase the lifespan of a person

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.