AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC 2027 : पहिल्या पराभवानंतर ऑस्ट्रेलिया मोठा धक्का, गुणतालिकेत झाली अशी उलथापालथ

WTC Points Table: एशेज कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा हा पहिला पराभव आहे. त्याचा परिणाम गुणतालिकेवर झाला असून काय बदल झाला ते जाणून घ्या.

WTC 2027 : पहिल्या पराभवानंतर ऑस्ट्रेलिया मोठा धक्का, गुणतालिकेत झाली अशी उलथापालथ
WTC 2027 : पहिल्या पराभवानंतर ऑस्ट्रेलिया मोठा धक्का, गुणतालिकेत झाली अशी उलथापालथImage Credit source: England Cricket Twitter
| Updated on: Dec 27, 2025 | 4:28 PM
Share

World Test Championship 2025-27 Points Table: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाची विजयाची मालिका अखेर खंडीत झाली आहे. ऑस्ट्रेलियाने सलग सहा कसोटी सामन्यात विजय मिळवला होता. मात्र मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये खेळल्या गेलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला 4 गडी राखून 14 वर्षानंतर ऑस्ट्रेलियात कसोटी विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे हा सामना फक्त दोन दिवसातच संपला. या पराभवामुळे गुणातलिकेत उलथापालथ झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या विजयी टक्केवारीवर याचा परिणाम झाला आहे. तर इंग्लंडलाही या विजयामुळे फार काही फायदा झालेला नाही. या विजयानंतर इंग्लंडची विजयी टक्केवारी 27.08 वरून 35.19 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. पण गुणतालिकेत अजूनही सातव्या स्थानावर आहे. इंग्लंडने आतापर्यंत खेळलेल्या 9 पैकी फक्त तीन सामन्यात विजय मिळवला आहे. तर पाच सामन्यात पराभव आणि एक सामना बरोबरीत सुटला आहे.

ऑस्ट्रेलियाला या पराभवामुळे मोठा फटका बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा गुणतालिकेत पहिलं स्थान कायम आहे. पण या पराभवामुळे विजयी टक्केवारीत मात्र घट झाली आहे. सलग सहा सामने जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी ही 100 होती होती. पण आता झालेल्या पराभवानंतर विजयी टक्केवारी 85.71 टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयी टक्केवारी कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. त्यांची विजयी टक्केवारी 77.78 आहे. तर दक्षिण अफ्रिकेने चार पैकी 3 सामने जिंकत तिसरं स्थान पटकावलं आहे.

श्रीलंकेने आतापर्यंत दोन सामने खेळले असून एका सामन्यात विजय आणि एक सामना ड्रॉ झाला आहे. श्रीलंकेची विजयी टक्केवारी 66.67 टक्के असून चौथ्या स्थानी आहे. तर पाकिस्तानने एका सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. त्यामुळे विजयी टक्केवारी ही 50 असून पाचव्या स्थानावर आहे. भारतीय संघ सहाव्या स्थानावर आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धची मालिका गमावल्याने भारताला फटका बसला आहे. भारताने 9 सामने खेळले. त्यात चार सामन्यात विजय आणि चार सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. तर एक सामना ड्रा झाल्याने विजयी टक्केवारी 48.15 आहे.

बांगलादेशचा संघ आठव्या स्थानी असून दोन पैकी एक सामना गमवला आणि एक सामना ड्रॉ झाला आहे. त्यामुळे विजयी टक्केवारी 16.67 टक्के आहे. वेस्ट इंडिज शेवटच्या स्थानी असून 8 पैकी सात सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. तर एक सामना ड्रॉ झाल्याने विजयी टक्केवारी 4.17 टक्के असून शेवटच्या स्थानी आहे.

मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.