एशेज सीरिज
एशेज मालिका ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठीत स्पर्धा आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला 100 वर्षांहून अधिकचा इतिहास आहे. या कसोटी मालिकेला 1877 मध्ये सुरुवात झाली होती. मेरीलेबोन क्रिकेट क्लबच्या मते, 1882 मध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला त्यांच्याच भूमीत पराभूत केलं होतं. तेव्हा 1882 मध्ये या मालिकेचा उल्लेख एशेज असा करण्यात आला होता. तेव्हापासून दोन्ही संघात द्वंद्व पाहायला मिळते.
AUS vs ENG: सिडनी कसोटी सामना संपताच मैदानात चाहत्यांनी घेतली धाव, नेमकं काय घडलं ते जाणून घ्या
एशेज कसोटी मालिकेतील पाचवा अर्थात शेवटचा कसोटी सामना सिडनीत पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलियाने पाच विकेट राखून जिंकला. तसेच मालिका 4-1 ने खिशात घातली. असं असताना पाचवा सामना संपल्यानंतर चाहत्यांनी थेट मैदानात धाव घेतली आणि मैदानात चाहत्यांची गर्दी झाली.
- Rakesh Thakur
- Updated on: Jan 8, 2026
- 3:42 pm
Ashes Test: पाचव्या कसोटी सामन्याचा निकाल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने, असं घडलं शेवटच्या दिवशी
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील प्रतिष्ठित समजली जाणाऱ्या एशेज कसोटी मालिकेची सांगता झाली. ही मालिका ऑस्ट्रेलियाने 4-1 ने जिंकली. पण पाचवा कसोटी सामना पाचव्या दिवसापर्यंत चालला हे विशेष.. काय घडलं ते जाणून घ्या.
- Rakesh Thakur
- Updated on: Jan 8, 2026
- 2:44 pm
Aus vs ENG Test: पाचवा कसोटी सामना रंगतदार वळणावर, चौथ्या दिवशी इंग्लंडने डाव सावरला; पण…
एशेज कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना रंगतदार वळणावर आला आहे. यापूर्वी झालेल्या चार सामन्यात ऑस्ट्रेलियाने 3-1 ने आघाडी घेत मालिका खिशात घातली आहे. आता पाचव्या सामन्यात कोण बाजी मारणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Jan 7, 2026
- 5:37 pm
Ashes Test: स्टीव्ह स्मिथने शतकासह गाठला नवा टप्पा, अशी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज
Australia vs England, 5th Test: कर्णधार स्टीव्ह स्मिथने एशेज कसोटी मालिकेच्या तिसऱ्या दिवशी झंझावाती शतक ठोकलं. यासह त्याने क्रिकेट कारकिर्दीत महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. स्टीव्ह स्मिथच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Jan 6, 2026
- 10:30 pm
जो रुटचा कारनामा, एका खेळीसह सिडनीत खास कामगिरी
जो रुटने नववर्षाची जबरदस्त सुरुवात केली. रुटने एशेज सीरिजमधील पाचव्या आणि 2026 मधील पहिल्या कसोटीत 160 धावांची खेळी केली.
- sanjay patil
- Updated on: Jan 6, 2026
- 2:36 am
सिडनी कसोटीत राडा! बेन स्टोक्स आणि लाबुशेन भिडले Video Viral
एशेज कसोटी मालिकेतील शेवटचा सामना सिडनीत सुरु आहे. ही मालिका ऑस्ट्रेलियाने 3-1 ने आधीच जिंकली आहे. पण इंग्लंड शेवटचा कसोटी सामना जिंकून शेवट गोड करण्याच्या प्रयत्नात आहे. असं असताना या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मैदानात वाद पाहायला मिळाला.
- Rakesh Thakur
- Updated on: Jan 5, 2026
- 7:11 pm
सचिनचा आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड जो रुटच्या निशाण्यावर
इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रुट हा कसोटीत सर्वाधिक धावा करणारा सक्रीय फलंदाज आहे. रुटच्या नावावर सक्रीय आणि एकूण फलंदाज म्हणून असंख्य विक्रम आहे. आता रुटच्या निशाण्यावर सचिनचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे.
- sanjay patil
- Updated on: Jan 5, 2026
- 3:22 am
AUS vs ENG: ऑस्ट्रेलियाचा 2026 मधील पहिल्याच सामन्यात असा निर्णय, 137 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
Australia vs England 5th Test : ऑस्ट्रेलिया प्रतिष्ठेच्या एशेज सीरिजमध्ये 3-1 ने आघाडीवर आहे. उभयसंघातील पाचवा आणि अंतिम सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील एका निर्णयाची एकच चर्चा पाहायला मिळत आहे.
- sanjay patil
- Updated on: Jan 4, 2026
- 7:39 pm
AUS vs ENG : इंग्लंड पाचव्या आणि अंतिम कसोटीसाठी सज्ज, कांगारुंना पुन्हा लोळवणार?
Ashes Series Australia vs England 5th Test Live Streaming : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 2026 या वर्षातील पहिला कसोटी सामना हा सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या अंतिम सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे. या सामन्याबाबत सविस्तर जाणून घ्या.
- sanjay patil
- Updated on: Jan 4, 2026
- 1:15 am
AUS vs ENG : इंग्लंडकडून सिडनी कसोटीसाठी 12 सदस्यीय संघ जाहीर, Ashes साठी दोघांना पहिल्यांदाच संधी, सामना केव्हा?
Australia vs England 5th test Match Ashes Series : बेन स्टोक्स याच्या नेतृत्वात इंग्लंड क्रिकेट टीम पाचवा आणि अंतिम कसोटी सामना खेळणार आहे. इंग्लंड टीम मॅनेजमेंटने सामन्याच्या 48 तासांआधी 12 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.
- sanjay patil
- Updated on: Jan 2, 2026
- 4:59 pm
नवं वर्षाच्या सुरुवातीला या क्रिकेटपटूचं क्रिकेट करिअर संपणार, जाणून घ्या काय आहे कारण?
एशेस कसोटी मालिकेतील शेवटचा सामना या वर्षाच्या सुरुवातीला होणार आहे. या सामन्यानंतर उस्मान ख्वाजा निवृत्ती घेणार अशा चर्चांना जोर मिळाला आहे. त्यामुळे नव वर्षात रिटायर होणारा उस्मान ख्वाजा हा पहिला खेळाडू ठरू शकतो.
- Rakesh Thakur
- Updated on: Jan 1, 2026
- 4:57 pm
वर्ल्ड क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाची लाज गेली, एमसीजी खेळपट्टीवर आयसीसीने ओढले ताशेरे
Ashes 2025-2026 : एशेज कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात इंग्लंडने बाजी मारली. पण या खेळपट्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं आहे. कारण हा सामना फक्त दोन दिवसातच संपला होता. आता आयसीसीने या खेळपट्टीवर आपलं परखड मत नोंदवलं आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Dec 29, 2025
- 7:02 pm