Aus vs ENG Test: पाचवा कसोटी सामना रंगतदार वळणावर, चौथ्या दिवशी इंग्लंडने डाव सावरला; पण…
एशेज कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना रंगतदार वळणावर आला आहे. यापूर्वी झालेल्या चार सामन्यात ऑस्ट्रेलियाने 3-1 ने आघाडी घेत मालिका खिशात घातली आहे. आता पाचव्या सामन्यात कोण बाजी मारणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

एशेज कसोटी मालिका म्हंटलं क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी असते. या कसोटी मालिकेला एक इतिहास आणि क्रिकेटच्या मैदानातील द्वंद्व म्हणून पाहीलं जातं. या एशेज मालिकेची सांगता गुरुवारी होणार आहे. पाचव्या कसोटी सामन्याचा चार दिवसांचा खेळ संपला असून हा सामना रंगतदार वळणावर आला आहे. आता पाचव्या दिवशीचा कसा असेल याची उत्सुकता लागून आहे. आतापर्यंत झालेल्या चार दिवसांच्या खेळात ऑस्ट्रेलियाचं पारडं जड दिसत आहे. पण इंग्लंडने चौथ्या दिवशी कमबॅक केलं असून अजूनही दोन विकेट हातात आहे. आता पहिल्या सत्रात इंग्लंडचे फलंदाज कशी कामगिरी करतात? याकडे लक्ष असणार आहे. पहिल्या डावात इंग्लंडने सर्व गडी गमवून 384 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 567 धावांची खेली केली. यासह 183 धावांची आघाडी ऑस्ट्रेलियाला मिळाली. या धावांची आघाडी मोडत इंग्लंडने 8 गडी गमवून 302 धावा केल्या आहेत. इंग्लंडकडे 119 धावांची आघाडी असून दोन विकेट हाती आहेत.
पाचव्या दिवशी इंग्लंडच्या हाती दोन विकेट आहेत. जेकॉब बेथल याने 332 चेंडूंचा सामना केला असून नाबाद 142 धावांवर खेळत आहे. तर मॅथ्यू पॉट्स दिवसाच्या शेवटी मैदानात उतरला आणि 10 चेंडूंचा सामना केला. त्याच्या खात्यात एकही धाव नाही. आता दोन विकेटवर इंग्लंड किती तास पाचव्या दिवशी खेचणार याकडे लक्ष लागून आहे. कारण शेवटच्या दिवशी 90 षटकांचा खेळ होणार आहे. त्यामुळे इंग्लंड 200 पार धावा करण्याचा प्रयत्न करेल. तर ऑस्ट्रेलिया 150 धावांच्या आता दोन विकेट काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. जर इंग्लंडचे दोन्ही विकेट 150 धावांच्या आत पडले तर ऑस्ट्रेलियाचं पारडं जड होणार आहे. ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकू शकते आणि मालिका 4-1 ने खिशात घालेल.
दुसर्या डावात ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू ब्यू वेबस्टरने 3 विकेट काढल्या. चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर वेबस्टर म्हणाला की, आम्हाला शक्य तितक्या लवकर हे शेवटचे दोन विकेट काढायच्या आहेत. सकाळी मला धावा काढण्याची संधी मिळेल की नाही याची मला खात्री नाही. आशा आहे की त्याने दिलेल्या धावा पूर्ण करण्यासाठी टॉप चार खेळाडूंपेक्षा जास्त विकेट लागणार नाहीत. दुसरीकडे, बेन स्टोक्सने चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात षटक टाकण्यासाठी आला. पण फक्त 10 चेंडू टाकल्यानंतर त्याला वेदना होऊ लागल्या. फॉलो-थ्रू करताना थांबला आणि त्याच्या उजव्या मांडीला पकडले. त्याची दुखापत गंभीर असल्याचं दिसून आलं. इतकंच काय तर फलंदाजीतही फक्त 1 धाव करून बाद झाला. आता पाचव्या दिवशी गोलंदाजी करेल की नाही? याबाबत शंका आहे.
