AUS vs ENG : इंग्लंड पाचव्या आणि अंतिम कसोटीसाठी सज्ज, कांगारुंना पुन्हा लोळवणार?
Ashes Series Australia vs England 5th Test Live Streaming : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 2026 या वर्षातील पहिला कसोटी सामना हा सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या अंतिम सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे. या सामन्याबाबत सविस्तर जाणून घ्या.

यजमान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघ 2026 वर्षातील पहिला आणि एशेज सीरिजमधील पाचवा तसेच अंतिम सामना खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. ऑस्ट्रेलियाने ही मालिका आधीच आपल्या नावावर केली आहे. ऑस्टेलियाने पहिले आणि सलग 3 सामने जिंकून मालिका नावावर केली. तर इंग्लंडने चौथ्या सामन्यात दणक्यात कमबॅक करत विजयाचं खातं उघडलं. इंग्लंडने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये झालेल्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्याच दिवशी धुव्वा उडवत सामना जिंकला.
आता इंग्लंड पाचव्या आणि अंतिम सामन्यात विजय मिळवून पराभवातील अंतर कमी करण्यासाठी उतरणार आहे. इंग्लडंचा सलग दुसरा सामना जिंकून ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट विजयाने करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर ऑस्ट्रेलिया नववर्षाची सुरुवात विजयाने करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. अशात या सामन्यात चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवा सामना कुठे आणि कधी पाहायला मिळेल? हे सविस्तर जाणून घेऊयात.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड पाचवा कसोटी सामना केव्हा?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड पाचवा कसोटी सामना 4 जानेवारीपासून खेळवण्यात येणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड पाचवा कसोटी सामना कुठे?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड पाचवा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये खेळवण्यात येणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड पाचव्या कसोटी सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड पाचव्या कसोटी सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 5 वाजता टॉस होईल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड पाचवा कसोटी सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड पाचवा कसोटी सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड पाचवा कसोटी सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड पाचवा कसोटी सामना मोबाईलवर जिओहॉटस्टापर एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.
स्टीव्हन स्मिथकडे नेतृत्व
दरम्यान स्टीव्हन स्मिथ पाचव्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. स्टीव्हनने तिसऱ्या सामन्याचा अपवाद वगळता इतर सर्व कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळलीय. स्टीव्हनच्या नेतृत्वातच ऑस्ट्रेलियाचा चौथ्या सामन्यात पराभव झाला होता. स्टीव्हनचा कर्णधार म्हणून हा पहिलाच कसोटी पराभव होता. आता स्टीव्हन पाचव्या सामन्यात चौथ्या कसोटीतील पराभवाची परतफेड करणार की बेन स्टोक्स इंग्लंडला सलग आणि एकूण दुसरा सामना जिंकून देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
