Menopause Diet Tips : आहारात या पदार्थांचा कराल समावेश तर मेनोपॉजच्या लक्षणांचा होणार नाही त्रास

मेनोपॉज ही अशी स्थिती आहे, ज्याचा 45 ते 50 व्या वर्षानंतर प्रत्येक महिलेला सामना करावा लागतो. यानंतर महिलांची प्रजनन क्षमता संपते आणि त्या गर्भधारणा करू शकत नाहीत.

Menopause Diet Tips : आहारात या पदार्थांचा कराल समावेश तर मेनोपॉजच्या लक्षणांचा होणार नाही त्रास
Image Credit source: freepik
| Updated on: Aug 11, 2023 | 4:33 PM

नवी दिल्ली | 11 ऑगस्ट 2023 : रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज (menopause) दरम्यान महिलांमध्ये एस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन आणि टेस्टोस्टेरोन हार्मोन्सचा स्तर कमी होतो. त्यामुळे शरीरात अनेक तऱ्हेचे बदल झालेले दिसतात. मेनोपॉज ही अशी स्थिती आहे, ज्याचा 45 ते 50 व्या वर्षानंतर प्रत्येक महिलेला सामना करावा लागतो. यानंतर महिलांची प्रजनन क्षमता संपते आणि त्या गर्भधारणा करू शकत नाहीत.

मेनोपॉज नंतर महिलांना शरीरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषक तत्वं मिळवण्यासाठी विविध पदार्थ खाणे गरजेचे ठरते. कारण महिलांमध्ये बऱ्याच वेळेस लोह आणि कॅल्शिअमची कमतरता असते, जी योग्य आहाराद्वारे भरून काढता येते.

तुम्हीदेखील मेनोपॉजचा सामना करत असाल किंवा तुमच्या जवळची व्यक्ती या फेझमध्ये असेल तर आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश अत्यावश्यक ठरतो, ते जाणून घ्यावे.

संपूर्ण धान्य

संपूर्ण धान्यामध्ये पोषक तत्वं मुबलक प्रमाणात असतात. त्यांमध्ये पुरेशा प्रमाणात फायबर आणि व्हिटॅमिन – बी देखील असते. तुम्ही आहारात पोळी, क्विनोआ, बाजरी यांचा समावेश करू शकता.

पुरेशा प्रमाणात कॅल्शिअम घ्या

दुग्धजन्य पदार्थांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते, त्यांचे सेवन केल्याने आपली हाडे मजबूत होतात. दुग्धजन्य पदार्थ दिवसातून दोन ते तीन वेळा खाऊ शकता. दुग्धजन्य पदार्थांमध्ये अमीनो ॲसिड ग्लाइसिन जास्त असते, त्यामुळे के झोपेला देखील प्रोत्साहन देतात. हे पदार्थ सेवन केल्याने मेनोपॉज अथवा रजोनिवृत्तीच्या काळात महिलांना चांगली झोप येण्यास मदत होते.

प्रोटीन

मेनोपॉज मुळे एस्ट्रोजन हार्मोनचा स्तर कमी होतो, त्यामुळे स्नायूव हाडांची ताकद कमी होते. मात्र यामुळे मेनोपॉजचा सामना करणाऱ्या महिलांना ऑस्टियोपोरोसिसचा त्रास सहन करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत, आपल्या आहारात कॅल्शियमसह प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश केलाच पाहिजे.

फळं आणि भाज्या

ताजी फळं आणि भाज्या यांमध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स, अँटी-ऑक्सीडेंट आणि फायबर हे भरपूर असतात. त्यांचा आहारात समावेश केल्यास ते आरोग्यासाठी पोषक ठरते.