Thailand : थायलंडमध्ये नाईट क्लबला लागलेल्या आगीत 13 जणांचा मृत्यू, 35 हून अधिक जण भाजले

| Updated on: Aug 05, 2022 | 10:13 AM

या घटनेतील सर्व बळी हे थायलंडचे नागरिक होते." ही घटना घडल्यापासून परिसरात खळबळ माजली आहे. अनेकांचे नातेवाईटकांचा आगीत मृत्यू झाला आहे.

Thailand : थायलंडमध्ये नाईट क्लबला लागलेल्या आगीत 13 जणांचा मृत्यू, 35 हून अधिक जण भाजले
थायलंडमध्ये लागलेल्या आगीत अनेकांचा मृत्यू
Image Credit source: tv9marathi
Follow us on

मुंबई – थायलंडमध्ये  (Thailand) एक मोठी दुर्घटना घडली आहे. चोनबुरी प्रांतातील नाईट क्लबला लागलेल्या आगीत अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे. झालेल्या आगीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी (death) पडलेले सर्वजण थायलंडचे रहिवासी आहेत. थायलंड पोलिसांनी जाहीर केलेल्या माहिती नुसार या घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 35 हून अधिक जण भाजले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस कर्नल वुटीपोंग सोमजाई यांनी दूरध्वनीद्वारे ही माहिती दिली. “शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास सट्टाहिप जिल्ह्यातील माउंटन बी नाईट क्लबमध्ये (Night Club) आग लागली. या घटनेतील सर्व बळी हे थायलंडचे नागरिक होते.” ही घटना घडल्यापासून परिसरात खळबळ माजली आहे. अनेकांचे नातेवाईटकांचा आगीत मृत्यू झाला आहे.

थायलंडमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे.

थायलंडमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. चोनबुरी प्रांतातील नाईट क्लबला आग लागून १३ जणांचा मृत्यू झाला. या घटनेत 35 जण जखमीही झाले आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी रात्री हा अपघात झाला. आग लागली तेव्हा नाईट क्लबमध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच मृत्यचा आकडा वाढण्याची शक्यता अधिक आहे. कारण काही जण गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी जाहीर केली आहे.

परदेशी नागरिकांचा मृत्यू झाल्याची शक्यता

पोलीस कर्नल वुटीपोंग सोमजाई यांनी सांगितले की, सट्टाहिप जिल्ह्यातील माउंटन बी नाईट क्लबमध्ये सकाळी 1:00 वाजता (गुरुवारी 1800 GMT) आग लागली. बळींमध्ये बहुतांश थायलंडचे नागरिक आहेत. त्याचवेळी या अपघातात काही परदेशी नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. आग कशी लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा