1500 विमाने रद्द, मोठी खळबळ, सौदी अरेबियात प्रवासी अडकले, तीन विमानतळांना धोका, थेट..
सौदी अरेबियात तणाव हा अधिक वाढल्याचे बघायला मिळत आहे. हजारो विमाने रद्द करण्यात आली. विमाने एका मागून एक रद्द केली जात आहेत. हुती बंडखोरांमध्ये मोठे संकट सौदी अरेबियावर बघायला मिळतंय. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.

सौदी अरेबियात मोठी खळबळ उडाली. यमनमधील हुती बंडखोरांनी हल्ले केल्याच्या आरोपांमुळे सौदी अरेबियातील हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. विमानसेवा पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे बघायला मिळतंय. मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द करण्यात आली. याचा मोठा फटका सामान्य प्रवाशांना आणि उमराहला जाणाऱ्या भाविकांना बसत आहे. अनेक प्रवासी विमानतळावरच अडकून पडले आहेत. आंतरराष्ट्रीय विमान सेवांवरही परिणाम झाला आहे. विमान वाहतुकीतील या व्यत्ययामुळे धार्मिक प्रवासावरही परिणाम झाला आहे. तणाव अधिक वाढताना दिसत आहे. हल्ल्यानंतर प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण बघायला मिळतंय. बांगलादेशच्या प्रवासी कल्याण मंत्रालयानुसार, या हल्ल्यानंतर रियादमध्ये सुमारे 500 बांगलादेशी प्रवासी अडकून पडले होते.
सौदी विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 ऑक्टोबर रोजी झालेल्या या हल्ल्यात 13 जण ठार झाले आणि 300 हून अधिक जण जखमी झाले. त्यानंतर मोठी खळबळ उडाली. पूर्ण विमानसेवाही विस्कळीत झाल्याचे बघायला मिळतंय. 11 ऑक्टोबरच्या हल्ल्यात 11 जणांच जीव गेला. दम्माम एअरपोर्टला टार्गेट करत हा हल्ला करण्यात आला. या संकटामुळे सौदी अरेबियाबाहेर चालणाऱ्या विमान सेवांवरही परिणाम झाला आहे.
एतिहाद एअरवेजने अबुधाबी, रियाध, जेद्दाद आणि दम्माम दरम्यानची काही उड्डाणे 13 ऑक्टोबरपर्यंत रद्द केली आहेत. ज्याचा थेट फटका प्रवाशांना बसतोय. फ्लायदुबईने रियाधसाठीची विमान सेवा स्थगित ठेवण्याचा कालावधी 14 ऑक्टोबरपर्यंत वाढवला आहे. विमान सेवा रद्द झाल्यामुळे संयुक्त अरब अमिरातीमध्ये अडकलेल्या सौदी नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी दुबईतील सौदी वाणिज्य दूतावासाने बसची व्यवस्था केली आहे.
पुढील काही दिवस तणाव राहण्याची शक्यता आहे. त्यातच विमान कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द केली जात आहेत. विमान कंपन्यांना कोणत्याही प्रकारची जोखिम घ्यायची नाही. पण यामुळे प्रवाशांना प्रचंड मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. हुती बंडखोरांमध्ये साैदी अरेबियाचे टेन्शन चांगलेच वाढले आहे. त्यांच्याकडून विमानतळांना टार्गेट केले जात आहे. तणाव हा अधिक वाढताना दिसत आहे. जगात यामुळे मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय.