चेन्नईला निघालेलं विमान हवेत असतानाच फ्लाईटमध्ये लागली आग, थरारक Video
मोठी बातमी समोर येत आहे, मोठा अपघात टळला आहे. चन्नईला निघालेल्या एका विमानामध्ये हवेतच आगीचा भडका उडल्याचं पहायला मिळालं. यामुळे प्रवाशांमध्ये काही काळ मोठा गोंधळ उडाला होता.

मोठी बातमी समोर येत आहे, दिल्लीहून चेन्नईला निघालेल्या विमानाचा मोठा अपघात टळला आहे. प्रवासादरम्यान अचानक एका प्रवाशाच्या सामानाला आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं. विमानात मोठा गोंधळ उडाला. मात्र घटनेची माहिती मिळताच एअरलाईन्सच्या क्रू मेंबरने तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. मात्र या घटनेनंतर प्रोटकॉलनुसार या विमानाचं हैदराबाद येथील राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवर एमरजन्सी लँडिंग करण्यात आलं. इंडिगोच्या विमानात ही घटना घडली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार विमानात आग लागल्यानंतर इंडिगोचं फ्लाइट नंबर 6E 6115 याचं हैदराबाद येथील राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवर एमरजन्सी लँडिंग करण्यात आलं. या विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. विमान हैदराबादला लँड झाल्यानंतर याबाबत केबिन क्रू प्रवक्त्याकडून या घटनेबाबत माहिती देण्यात आली आहे. विमानातील एका प्रवाशाच्या सामानाला अचानक आग लागल्याची घटना घडली होती. परंतु आम्ही वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र या प्रवाशाच्या बॅगमध्ये आग लागण्यासारखी नेमकी कोणती वस्तू होती? याबाबत अजूनही कोणतीही माहिती समोर आलेली नाही, अशी माहिती इंडिगोच्या प्रवक्त्याने दिली आहे.
VIDEO | Hyderabad: Smoke detected in Chennai-bound Indigo flight from Delhi; plane diverted to Hyderabad, lands safely. Inside visuals from the plane.
(Source: Third Party)
(Full video available on PTI Videos – https://t.co/d8jp61yd2p) https://t.co/RSt6vbeTpB
— Press Trust of India (@PTI_News) October 11, 2026
मात्र विमानात जे प्रवासी होते, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या प्रवाशाच्या सामानाला आग लागली, त्याच्या बॅगेमध्ये पावर बँक होती आणि त्यामुळेच सामानाला आग लागल्याचा दावा करण्यात येत आहे, परंतु याबाबत अजूनही कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सुदैवाने आगेवर वेळेत नियंत्रण मिळवण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या प्रवाशांना हैदराबाद येथे उतरवण्यात आलं आहे, त्यानंतर त्यांना हैदराबादवरून दुसऱ्या विमानाने चेन्नईला रवाना करण्यात आलं आहे.