
भारताच्या शस्त्रास्त्र निर्यातीला आणखी बळ मिळणार आहे. रविवारी नागपूर येथील प्रकल्पातून पिनाका रॉकेट सिस्टिमची निर्यात ऑर्डर रवाना झाली. पिनाका ही भारताची मल्टि बॅरल रॉकेट सिस्टिम आहे. रेंज आणि अचूकता ही पिनाका रॉकेटची खासियत आहे. भारताने विकसित केलेल्या रॉकेट सिस्टिममध्ये जगातील अनेक देशांना रस आहे. पिनाका रॉकेट सिस्टिमच वैशिष्ट्य म्हणजे 44 सेकंदात 72 रॉकेट्स डागण्याची क्षमता. पिनाक रॉकेट्स सिस्टिम वेगवेगळ्या रेंजमध्ये आहे. 40 किमी अंतरावरील टार्गेट्सचा अचूक वेध घेता येतो. त्यानंतर 75 आता पुढचं लक्ष्य 120 किलोमीटर अंतरावरील लक्ष्य भेदाचं आहे. सोलार डिफेन्स आणि एरोस्पेस प्रकल्पात या पिनाका रॉकेट्सच उत्पादन करण्यात आलं आहे.
पिनाका रॉकेट सिस्टिममधून भारताच्या स्वेदशी शस्त्रास्त्र शक्तीची झलक दिसून येते. 44 सेकंदात 72 रॉकेट्स डागण्याची क्षमता म्हणजे समोरच्या शत्रुला श्वास घेण्याचा अवधीही मिळणार नाही इतकी ही घातक सिस्टिम आहे. भारताने अर्मेनियाला पिनाका रॉकेट्सची डिलिव्हरी केली आहे. भारत आता फक्त शस्त्रास्त्रांची आयात करणारा देश राहिलेला नाही, तर निर्यातही भारताने वाढवली आहे. 10 वर्षांपूर्वी भारताची शस्त्रास्त्र निर्यात 1000 हजार कोटींपेक्षाही कमी होती. आज तीच निर्यात 24 हजार कोटींपर्यंत पोहोचली आहे.
वेळेबरोबर या सिस्टिमची रेंज वाढत गेली
एप्रिल 2022 मध्ये यशस्वी चाचण्या झाल्यानंतर भारतीय लष्कराने आपल्या ताफ्यात पिनाकाच्या MK-I या अत्याधुनिक वर्जनचा समावेश केला. सुरुवातीला पिनाकाची रेंज 37.5 किलोमीटर होती. पण वेळेबरोबर या सिस्टिमची रेंज वाढत गेली. भारतीय लष्कर आता 120 किलोमीटरच्या नव्या रेंजच्या पिनाका रॉकेट्सचा समावेश करणार आहे. 120 किमी रेंजची डिसेंबर 2025 मध्ये यशस्वी चाचणी झाली. ज्या लॉन्चरवरुन 40 आणि 75 किमीवरील रॉकेट्स डागता येतात. त्याच लॉन्चरवरुन 120 किमी अंतरापर्यंत मारा करणारी रॉकेट्स डागता येतील.
अर्मेनिया सोबत किती हजार कोटीचा करार
सप्टेंबर 2022 मध्ये अर्मेनियाने भारतासोबत पिनाका मल्टि बॅरल रॉकेट लॉन्चरच्या चार बॅटरीसाठी 2000 हजार कोटींचा करार केला. यात रणगाडा विरोधी रॉकेट्स, दारुगोळा आणि अन्य साहित्याचा समावेश आहे. अर्मेनियाने विकत घेतलं तर फ्रान्सने सुद्धा पिनाकामध्ये इंटरेस्ट दाखवलाय.