क्रिकेटपटूंचा कहर, संघ ज्या हॉटेलमध्ये थांबला त्याच हॉटेलमध्ये महिलांचे अंघोळ करतानाचे गुपचूप काढले व्हिडीओ, थेट..

नुकताच एक अत्यंत धक्कादायक आणि झोप उडवणारी बातमी पुढे आली. क्रिकेट विश्वासाला काळींबा फासणारी ही घटना आहे. चक्क दोन क्रिकेटरने हॉटेलमध्ये महिला अंघोळ करत असताना व्हिडीओ रेकॉर्ड केला. पोलिसांनी या दोघांनाही घटनेनंतर अटक केली.

क्रिकेटपटूंचा कहर, संघ ज्या हॉटेलमध्ये थांबला त्याच हॉटेलमध्ये महिलांचे अंघोळ करतानाचे गुपचूप काढले व्हिडीओ, थेट..
Under 19 team
| Updated on: May 01, 2026 | 8:35 AM

नुकताच एक अतिशय धक्कादायक आणि तळपायाची आग डोक्यात जाणारी बातमी पुढे येत आहे. हॉटेलच्या बाथरूममध्ये महिलांचे गुपचूप व्हिडिओ रेकॉर्ड केल्याची घटना पुढे आली. धक्कादायक बाब म्हणजे हे व्हिडीओ रेकॉर्ड दोन क्रिकेटरने केले. या बातमीने क्रिकेट विश्व हादरून गेले. हॉटेलच्या बाथरूममध्ये महिलांचे चोरून व्हिडीओ रेकॉर्ड केल्याप्रकरणी पोलसांनी श्रीलंकेच्या 19 वर्षाखालील क्रिकेट संघातील दोन खेळाडूंना अटक केली. ही घटना कोलंबो येथे घडली. या खेळाडूंनी महिला अंघोळ करत असताना चोरून व्हिडीओ रेकॉर्ड केले. या दोघांनी व्हिडीओ रेकॉर्ड केल्यानंतर व्हिडीओ ऑनलाईन शेअर केले नाही ना किंवा कोणत्या साईटला अपलोड केले नाही ना याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. मात्र, या घटनेने मोठी खळबळ उडालीये.

याबाबत मिळालेली अधिकची माहिती अशी की, श्रीलंकेच्या 19 वर्षाखालील संघ ज्या हॉटेलमध्ये थांबला होते तिथेच एक डॉक्टरांची परिषद होती. या परिषदेकरिता अनेक महिला डॉक्टर उपस्थित होत्या. या महिला डॉक्टरांनी तक्रार केली की, त्या अंघोळ करत असताना कोणीतरी मोबाईलमध्ये त्यांचा गुपचूप व्हिडीओ रेकॉर्ड केला. ज्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.

पोलिसांना आढळून आले की, याच हॉटेलमध्ये 19 वर्षाखालील श्रीलंकेचा संघ देखील थांबला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असताच 19 वर्षाखालील संघातील दोन खेळाडूंनीच महिला डॉक्टरांचा अंघोळ करतानाच व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचे पुढे आले. ज्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या दोन्ही खेळाडूंना अटक केले. त्यांची कसून चाैकशी केली.

त्यांच्या फोनमध्ये महिला डॉक्टरांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ देखील सापडली. पोलिसांकडून या खेळाडूंनी ही व्हिडीओ कुठे शेअर केली नाही ना याचा तपात केला जात आहे. या प्रकारानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने काहीही भाष्य केले नाही. मात्र, क्रिकेटच्या विश्वात काळींबा फासणारी ही घटना नक्कीच घडलीये. नाराहेनपिता पोलिसांनी या दोन क्रिकेटरला कोर्टात हजर केले असता त्यांना 5 लाख प्रत्येकी भरल्यानंतर जामीन मंजूर करण्यात आला. पोलिसांकडून या प्रकरणात अधिकचा तपास केला जात आहे.

Follow Us