इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेला पहिला मोठा दणका! थेट 6 देशांनी घेतली विरोधात भूमिका, आम्ही सहमत नाही…

अमेरिका आणि इराण युद्ध सुरू आहे. युद्धाला पंधरा दिवस पूर्ण होत नाहीत तोवरच अनेक देश वैतागले आहेत. अमेरिकेने थेट या युद्धात आपली भूमिका बदलल्याने मोठी खळबळ उडाली. आता काही देश थेट अमेरिकेच्या विरोधात भूमिका घेताना दिसत आहेत.

इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेला पहिला मोठा दणका! थेट 6 देशांनी घेतली विरोधात भूमिका, आम्ही सहमत नाही...
Donald Trump
| Updated on: Mar 14, 2026 | 12:28 PM

अमेरिका आणि इराण युद्ध एका घातक वळणावर आहे. मोठे हल्ले केले जात असतानाच अमेरिकेकडून इराणच्या सर्वात महत्वाच्या बेटावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर इराणने अशी काही धमकी दिली की, जगात खळबळ उडाली. इराण आणि अमेरिका यांच्या युद्धात जगापुढे तेलाचे मोठे संकट आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमती प्रचंड वाढल्या असून थेट 100 डॉलर प्रति बॅरल तेलाच्या किंमती झाल्या. या तेलाच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिकेने मास्टर प्लॅन तयार केला आणि थेट रशियाच्या तेलावर लावलेले सर्व निर्बंध 30 दिवसांसाठी उठवले. जागतिक बाजारपेठेत वाढलेल्या तेलाच्या किंमतीवर नियंत्रण मिळवण्याकरिता अमेरिकेने हे पाऊस उचलले. मात्र, अमेरिकेच्या या निर्णयाने युरोप नाराज आहे.

कारण काही महिन्यांपूर्वीच रशियाकडून तेल खरेदी न करण्याकरिता अमेरिका भारतासह अनेक देशांवर निर्बंध लादत होती. युरोपीय नेत्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना रशियन तेलावरील निर्बंध उठवण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. जर्मनीनेही अमेरिकेच्या या निर्णयाला विरोध केला. फक्त जर्मनीच नाही तर जी-7 च्या सातपैकी 6 देशांनी अमेरिकेच्या या निर्णयाला उघडपणे विरोध केला.

रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू असताना अमेरिकेने रशियाच्या तेलावर अनेक निर्बंध लादले. त्यानंतर आता इराणसोबतच्या युद्धात थेट हे सर्व निर्बंध हटवण्याची घोषणा केली. अमेरिकेच्या या निर्णयावर कॅनडा, जर्मनी आणि नॉर्वेच्या नेत्यांनी नाराजीचा सूर लावला. अमेरिकेच्या निर्णयाच्या विरोधात अनेक देश आता जाहीरपणे बोलताना दिसत आहेत. रशियावरील निर्बंध हटवणे हा त्याचा पर्याय नसून ठोस उपायोजना या युद्धात अमेरिकेने करणे आवश्यक आहे.

इराणसोबत सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेला एका मागून एक धक्के बसताना दिसत आहेत. कारण इराणकडून अमेरिकेने जो विचारही केला नाही असे उत्तर दिले जात आहे. त्यामध्येच रशियावरील निर्बंध हटवण्याची वेळ आली आणि थेट जे देश अमेरिकेच्या हो मध्ये हो मिसळून पुढे जायचे ते देश आता कुठेही अमेरिकेला विरोध करताना दिसत आहेत.

Follow Us