AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगात हाहाकाराला सुरूवात! इराणकडून थेट झोप उडवणारी धमकी, अमेरिकेने ती चूक केली तर..

इराण आणि अमेरिका युद्ध टोकाला पोहोचले असून बेटावरील हल्ल्यानंतर इराण अधिक आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. त्यामध्येच इराणकडून आता अशी एक धमकी देण्यात आली की, संपूर्ण जगाने मोठा धसका घेतल्याचे दिसत आहे. जगात हाहाकार सुरू झाला आहे.

जगात हाहाकाराला सुरूवात! इराणकडून थेट झोप उडवणारी धमकी, अमेरिकेने ती चूक केली तर..
Iran
| Updated on: Mar 14, 2026 | 11:19 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध सुरू आहे. या युद्धाचा फटका सर्वच देशांना बसत आहे. भारताने या युद्धाबाबत आपली भूमिका अगोदरच स्पष्ट केली. युद्ध थांबवण्याकरिता अनेक देश विनंती करत आहेत. मात्र, युद्ध अधिक भडकताना दिसत आहे. या युद्धादरम्यान अमेरिका अडचणीत सापडली असून थेट रशियाकडून तेल खरेदी करण्यास जगातील देशांना अमेरिकेने सांगितले. होर्मुज मार्ग इराणकडून बंद करण्यात आल्याने अमेरिकेवर मोठा दबाव आहे. हा मार्ग लवकरात लवकर सुरू करा नाही तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकी अगोदरच अमेरिकेने दिली. यामध्येच इराणच्या महत्वाच्या बेटावर अमेरिकेने घातक हल्ला केला. मात्र, त्यानंतरही इराणचे धैर्य खचले नसून इराणकडूनही याचा बदला म्हणून मोठे हल्ले आखाती देशात असलेल्या अमेरिकेच्या लष्कर तळांवर केले जात आहेत. आता पुन्हा अमेरिकन दूतावासालाही टार्गेट केले जात आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन सैन्याने इराणच्या खार्ग बेटावर जोरदार बॉम्बहल्ला केला आणि लष्कर तळांना नष्ट केल्याचे म्हटले. यावर आता इराणकडून जोरदार प्रतिउत्तर अमेरिकेला देण्यात आले. इराणकडून जगाची झोप उडवणारी थेट धमकीच देण्यात आली. इराणच्या खातम अल-अंबिया केंद्रीय मुख्यालयाच्या प्रवक्त्याने म्हटले की, जर तेल, आर्थिक किंवा ऊर्जा सुविधांवर हल्ला झाला तर इराण लगेचच प्रतिउत्तर देईल.

खळबजनक म्हणजे त्यांनी पुढे म्हटले की, आमचे तेल, आर्थिक आणि ऊर्जा संबंधित पायाभूत सुविधांवर हल्ला झाला तर संपूर्ण प्रदेशातील अमेरिकेची भागीदारी असलेल्या किंवा अमेरिकेला पाठिंबा देणाऱ्या कंपन्यांना आणि त्यांच्या मालकीच्या कंपन्यांवर मोठे हल्ले करून प्रतिउत्तर हल्ला करू.

खार्ग बेटावर हल्ला अशा वेळी झाला आहे जेव्हा अमेरिकन सैन्याने मध्य पूर्वेत 2500 सैन्य आणि एक प्राणघातक जहाज तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.  खार्ग बेट इराणच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे आहे. तिथेच मोठा हल्ला करण्यात आल्याने इराणकडून मोठी धमकी देण्यात आली. आता थेट अमेरिकेसोबत संबंधित आणि या युद्धात त्यांच्या पाठिंबा देणाऱ्या कंपन्यांवर हल्ला करण्याचा इशारा इराणकडून देण्यात आला.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल