AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्धाच्या 14 दिवसांमध्येच अमेरिकेवर भीक मागण्याची वेळ, इराणचा वाढला आत्मविश्वास, थेट हल्ल्यानंतर..

इराण आणि अमेरिका युद्ध एका वेगळ्या स्थितीमध्ये आले. या युद्धादरम्यान अमेरिकेने मोठी घोषणा करत थेट रशियाकडून तेल खरेदी करण्याचे आवाहन जगातील देशांना केले. यादरम्यानच इराणकडून अत्यंत मोठा दणका अमेरिकेला देण्यात आला.

युद्धाच्या 14 दिवसांमध्येच अमेरिकेवर भीक मागण्याची वेळ, इराणचा वाढला आत्मविश्वास, थेट हल्ल्यानंतर..
Iran and America war
| Updated on: Mar 14, 2026 | 10:48 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध फक्त युद्धाच्या मैदानातच नाही तर सोशल मीडियावरही सुरू आहे. इराणचे खार्ग बेट नष्ट करण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याला तेहरानकडून कडक शब्दात फटकारण्यात आले. हेच नाही तर इराणने डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांची जागाही दाखवली. आमच्यासोबतच्या युद्धात 14 दिवसांमध्येच अमेरिका भीक मागण्याची वेळ आली. रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या मुद्द्यावरून इराणला हा टोला लगावला. आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतींमध्ये वाढ रोखण्यासाठी अमेरिकेने जगभरातील देशांना रशियाकडून तेल खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. काही महिन्यांपूर्वीच रशियाच्या तेलावर अनेक निर्बंध लादत, जो देश रशियाकडून तेल खरेदी करत आहे, त्याच्यावर अमेरिका टॅरिफ लावत होती आणि इराणसोबतच्या युद्धात अचानक अमेरिकेची भूमिका बदलल्याने इराणकडून अमेरिका 14 दिवसांमध्येच रशियाकडून भीक मागत असल्याची बोचरी टीका करण्यात आली.

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरघची यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत म्हटले की, कित्येक महिन्यांपासून अमेरिका भारताला रशियन तेल घेण्यापासून रोखत होती आणि इराणसोबत युद्ध सुरू होऊन दोन आठवड्यांमध्येच भारतासह जगाला रशियाकडून तेल खरेदी करण्याचे विनंती व्हाईट हाऊस करत आहे. अमेरिकेकडून मोठे घाव इराणला पोहोचवले जात आहेत. मात्र, इराण काही पराभव पत्कारत नाही.

अमेरिकेने एक हल्ला केला तर इराण चार हल्ले करत असल्याची वस्तूस्थिती सध्याच्या घडीला आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे रशियाला फायदा होत असून त्यांच्या तेलाची मागणीही प्रचंड वाढली आहे. ट्रम्प प्रशासनाने जगभरातील देशांकडून रशियन तेल खरेदीवर 30 दिवसांची स्थगिती जाहीर केली. अमेरिकेने रशियाकडून जगातील देशांना सांगितल्यानंतर इराणचे धैर्य वाढले असून अमेरिका कुठेतरी झुकत असल्याचा संदेश स्पष्टपणे इराणला मिळाला.

जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 100 डॉलर्सच्या पुढे गेल्यामुळे अमेरिकेने रशियाकडून तेल खरेदी करण्याचे आवाहन केले. होर्मुज सामुद्रधुनीतील अडथळ्यांमुळे पुरवठा विस्कळीत झाला आहे, ज्यामुळे किंमती वाढल्या आहेत. इतके मोठे हल्ले झालेले असतानाच इराण मोठ्या धैर्याने या युद्धाला सामोरे जात आहे. चीन, उत्तर कोरिया आणि रशिया इराणच्या बाजूने ठाम असल्याचे दिसत आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल