AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत इराणच्या मदतीला, अमेरिका दणका, थेट घेतला मोठा निर्णय, सैनिकांना…

इराण आणि अमेरिका यांच्या युद्धाबाबत मोठी माहिती पुढे येत आहे. भारत आणि इराणच्या मदतीला धावून आल्याचे बघायला मिळत आहे. इराणकडून भारताचे जहाज होर्मुजमधून जाऊ दिले असतानाच भारतानेही मोठा निर्णय घेतला आहे.

भारत इराणच्या मदतीला, अमेरिका दणका, थेट घेतला मोठा निर्णय, सैनिकांना...
India and Iran
| Updated on: Mar 14, 2026 | 9:58 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धाचा आज 15 वा दिवस आहे. मात्र, युद्धाचे ढग काही कमी होण्याचे नाव घेत नाहीत. जसे जसे दिवस पुढे जात आहेत, तसे हे युद्ध अधिक घातक बनत चालले आहे. विशाखापट्टनम येथून युद्ध सराव करून इराणच्या दिशेने निघालेल्या इराणी युद्धनाैकेवर मोठा हल्ला अमेरिकेकडून करण्यात आला. अमेरिकेच्या पाणबुडीने थेट मोठी धडक या युद्धनाैकेला दिली आणि ही युद्धनाैका बुडाली. ही घटना श्रीलंकेच्या समुद्रहद्दीत घडली. यानंतर श्रीलंकेकडून लगेचच बचावकार्य राबवत इराणी सैनिकांना सुरक्षित काढले. या हल्ल्यानंतर मोठी खळबळ उडाली. श्रीलंकेमध्ये या इराणी सैनिकांवर उपचार करण्यात आले. मात्र, युद्ध जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत या सैनिकांना श्रीलंकेत ठेवावे, याकरिता अमेरिका दबाव टाकत होती. अमेरिकेच्या विरोधात जाऊन श्रीलंकेने या सैनिकांना आणि इराणी सैनिकांच्या पार्थिवाला इराणमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला. याकरिता भारत इराणच्या मदतीला धावून आला.

या युद्धनाैकेवर 180 इराणी सैनिक होते. त्यापैकी 87 जणांचा मृत्यु झाला तर काही सैनिक बेपत्ता झाले. विशाखापट्टनममध्ये ही इराणी युद्धनाैका युद्ध सरावाकरिता आली होती. फक्त इराणी नाैकाच नाही तर अनेक देश या सरावात सहभागी झाले होते. इराणच्या दिशेने श्रीलंकेच्या समुद्र हद्दीत हल्ला करण्यात आला आणि इराणी युद्धनाैका बुडवण्यात आली.

याबाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुर्कीच्या एअरलाईन्सच्या विमानाने काही तासात कोची विमानतळाहून इराणी सैनिकांना पाठवले जाईल. इराणकडून आपले 180 सैनिक परत नेण्यासाठी व्यवस्था केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या युद्धनाैकेवर 183 एकूण इराणी सैनिक होते. विमानाच्या माध्यमातून त्यांना पहिल्यांदाच आर्मेनिया येथे घेऊन गेले जाईल आणि त्यानंतर रस्त्याच्या मार्गे इराणला पोहोचवले जाईल.

भारत सध्याच्या काळात ऊर्जेच्या संकटात आहे. एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा भारतात आजच्या घडीला आहे. यादरम्यान आपले जहाज सुरक्षित भारतात आणण्याकरिता भारत सतत इराणच्या संपर्कात आहे. इराणकडून भारताच्या जहाजांना होर्मुजमधून सुरक्षित मार्ग दिला जात आहे. यादरम्यानच आता इराणी सैनिकांचे विमान कोचीमधून निघणार आहे. मात्र, याबाबत अधिक माहिती देणे अधिकाऱ्यांनी टाळले आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल