AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात आता कृत्रिम पाऊस पडणार? बडा मंत्री म्हणाला मुख्यमंत्री निर्णय…दिली महत्त्वाची माहिती!

आम्हाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. नेतेमंडळी शेतीच्या बांधावर गेल्यानंतर शेतकरी आपली व्यथा मांडत आहेत. दरम्यान आता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यात कृत्रिम पाऊस पाडावा, त्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी केली जातेय. आता यावर मंत्री जयकुमार गोरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

राज्यात आता कृत्रिम पाऊस पडणार? बडा मंत्री म्हणाला मुख्यमंत्री निर्णय...दिली महत्त्वाची माहिती!
farmer id maharashtra rain newsImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 20, 2026 | 8:35 PM
Share

रवी लव्हेकर, टीव्ही 9 मराठी, सालोपूर : सध्या राज्यात दुष्काळाने डोके वर काढलेय. कृषीमंत्री सध्या राज्यभर दौरा करून हातातून गेलेल्या पिकाची पाहणी करत आहेत. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र तसेच राज्यातील इतरही भागात दुष्काळाची ही स्थिती गंभीर बनली आहे. काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील उभे पीक काढून टाकले आहे. आम्हाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली जात आहे. नेतेमंडळी शेतीच्या बांधावर गेल्यानंतर शेतकरी आपली व्यथा मांडत आहेत. दरम्यान आता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यात कृत्रिम पाऊस पाडावा, त्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी केली जातेय. आता यावर मंत्री जयकुमार गोरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

अंतिम निर्णय घ्यायचा अधिकार…

कृत्रिम पावसाचे जे काही प्रयत्न झाले, त्याला महाराष्ट्रात आजपर्यंत यश आलेले नाही. तरीदेखील राज्यात मात्र कृत्रिम पाऊस पाडायचा का नाही याबाबतचा अंतिम निर्णय घ्यायचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे, असे महत्त्वाचे भाष्य जयकुमार गोरे यांनी केले. तसेच सध्या पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सोलापूर, सातारा अशा जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा असल्याने काही अंशी शेतीचा प्रश्न मिटला आहे. तरीही उजनी सारख्या धरणाच्या पाण्यातून सोलापूर जिल्ह्याला पुढील एक वर्षभराचे नियोजन करावे लागणार असल्याचे मत सोलापूरचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.

आवश्यक तिथे सर्व उपायोजना करणार

सध्या सोलापूर जिल्ह्यात 50 टँकरने पाणीपुरवठा केला जातोय. उद्याच आपण टंचाईची बैठक घेऊन जिथे जिथे टँकर लागतील, जनावरांना पाण्यासाठीच्या व्यवस्था लागतील तिथे सर्व आवश्यक उपाययोजना करणार असल्याचेही यावेली गोरे यांनी सांगितले. तसेच उजनी धरण सध्या भरले आहे. याच धरणाच्या पाण्यावर पिण्याच्या पाण्याच्या, शेतीच्या जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटतो. पाऊस पुढच्या वर्षी जून महिन्यात पडेल. त्यामुळे उजनीचे पाणी एक वर्षभर पुरवण्याचे नियोजन प्रशासनाला करावे लागणार असल्याचे यावेळी पालकमंत्री गोरे यांनी सांगितले. दरम्यान, आता जयकुमार गोरे यांनी सांगितल्यानुसार राज्यात कृत्रिम पाऊस पाडायचा की नाही याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत. भविष्यात याबाबत सकारात्मक निर्णय होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल